बाप…
चपलांचा तुटलेला अंगठा
शिवून शिवून घालणारा
पोराला काटा टोचू न देता
खांद्यावर घेऊन चालणारा
तुमचा माझा जन्मदाता
बाप होऊन जगताना
जबाबदारीच ओझं झेलताना
येरवळीच वाकून जातो…
पोराला सुटबुटात पाहन्याची
स्वप्न उराशी बाळगत
संकटांची माळ गळ्यात घालून
कष्टाचं रान पेरतो
भुईतून उगविलेल्या तनाला
लेक समजून गोंजारतो….
बाप तुझा माझा जगताना
रागा रागात पाहत असतो
चुकू नये पोरांचं पाऊल
म्हणून माया लपवत असतो….
काळजाचा तुकडा सासर घरी
निघतो तेव्हा लेकीची माया
लाल बुंद डोळयांतून वाहताना
ढसा ढसा अश्रू ढळ्तो
तो तुमचा आणि माझा बाप…
हरवलेला एखादा क्षण शोधताना
टीप टीप गाळत जड पावलांनी
रानावनात भटकत असतो
तेव्हा लेकीची आठवण
भेगाळलेल्या मातीमध्ये रुजवत असतो…..
स्वाती ठुबे,
औषध निर्माण अधिकारी
मोबाईल – 8999756822
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
दीपगृह पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना – सर्बानंद सोनोवाल