पहिला पाऊस
आस लावूनी बसली
धरणी ही माता
पहिला पाऊस येताच
आनंदली भूमाता…
मातीचा सुगंध
आसमंती पसरला
धुंद होऊनी मग
मोगराही बहरला….
मरगळलेल्या रोपांना
अंकुर फुटून आले
पानापानांत दिसे
मोहोर छान फुले…
फुलातून फळ कसे
हळूच डोकावून पहाते
झालाय माझा जन्म
ही किमया वर्षा करते…
रिमझिम पाऊस बरसतो
बालचमुंचा मेळावा भरतो
आनंदाने नाचत रहातो
जलधारा अंगावर घेतो…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.