संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत आहेत. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. “तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम” या अभंगावर आधारित घरगुती हालता देखावा इचलकरंजी येथील खंजीरे मळ्यातील भालचंद्र पंढरीनाथ टाकवडे यांनी सादर केला आहे.
टाकवडे यांनी यापूर्वी सादर केलेल्या लबाड लांडगा ढोंग करतंय, चंद्रभागा तिरी वैष्णव नाचती, कृष्ण लीला, घन:शाम सुंदरा .. श्रीधरा (पहाटेचा दृश्य), मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, पाणी वाचवा (छोटा भीम व त्यांचे सहकारी) या देखाव्यांना विविध पारितोषिके मिळाली आहेत.