बिबट्या आपल्या परिसरात आढळल्यास किंवा अन्य वन्य प्राणी आपल्या राहत्या वसाहतीजवळ, गावाजवळ दिसल्यास कोणती काळजी घ्यायला हवी.? वन्य प्राण्यांची पिल्ले आढळल्यास काय करायला हवे ? याबाबत जाणून घ्या अजितकुमार पाटील यांनी दिलेल्या टीप्समधून
बिबट्या गावाजवळ आढळल्यास… –
- माहिती तपासून पहा.
- फोनद्वारे वनविभागाला माहिती द्या.
- दगडे व काठ्या मारु नका, बिबट हल्ला करु शकतो.
- गावकऱ्यांना सतर्क करा व क्षेत्राला प्रतिबंधित करा.
- वन्य प्राण्याजवळ गावकऱ्यांनी जाऊ नये.
- प्राण्यांना घेरु नका.
- गावकऱ्यांना सावध करा.
- प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा.
- रात्री पाळीव प्राण्यांना सांभाळा.
- सूर्यास्तापासून व सुर्योदयापर्यंत बाहेर जाऊ नका.
- वन्यप्राणी जाण्यापर्यंत त्या क्षेत्राचे निरीक्षण करा.
बिबट्या गावात घुसल्यास…
- माहिती तपासून पहा.
- लोकांना प्राण्यांपासून दूर ठेवा.
- त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा.
- माहिती वनविभागाला द्या.
- लोकांनी आपआपल्या घरात सुरक्षित राहावे.
- लहान मुलांना व वयस्कर नागरिकांना प्राण्यांपासून दूर ठेवा.
- कोणीही दगड व काठ्या मारु नये.
- प्राण्यांना डिवचू नये. मोठ्याने आवाज करु नये.
- सुरक्षित अंतरावरुन प्राण्यांचे निरीक्षण करा.
- नोंदीकरीता दुरुन वन्यप्राण्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा.
बिबट्याची पिल्ले गावाजवळ दिसल्यास…
- माहिती तपासून पहा.
- त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा.
- पिल्लांना हात लावू नका.
- फोनवरुन माहिती वनविभागाला द्या.
- बिबट्याच्या पिलांना सुरक्षित ठेवा व लोकांना दूर ठेवा.
- कुत्रे व इतर प्राण्यांना पिल्लांपासून दूर ठेवा.
- त्यांना कोणतेही खाद्य देऊ नका.
- दगडे व काठ्या मारु नका.
- मदत येईपर्यंत सुरक्षित अंतरावरुन त्यांचे निरीक्षण करा.
- कोणतीही अफवा/छायाचित्र पसरवू नका.
बिबट्या घरात/गोठ्यात घुसल्यास…
- घरातील लोकांना प्रथम बाहेर काढा.
- घराचे दार बाहेरुन बंद करा.
- वन्य प्राणी बाहेर जाऊ नये याची काळजी घ्या.
- फोनद्वारे तात्काळ वनविभागाला माहिती द्या.
- त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा.
- आसपासचे लोक घरी सुरक्षित असल्याची काळजी घ्या, लोकांनी घराची दारे व खिडक्या बंद ठेवाव्यात.
- लहान मुले व वयस्कर नागरीकांना दूर ठेवा.
- स्वत:ला सुरक्षित ठेवा.
- पाळीव प्राण्यांना वाचविण्याचा प्रयत्न करु नका.
- जर गोठा बंद नसेल तर बिबट आपोआप निघून जाईल.
- वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत दक्षता घ्या.
बिबट्या विहीरीत पडल्यास…
- माहिती तपासून पहा.
- त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा.
- माहिती वनविभागाला द्या.
- लोकांना त्या ठिकाणापासून दूर ठेवा.
- लहान मुले व वयस्करांना दूर ठेवा.
- विहीरीत शिडी व मोठे लाकूड टाका.
- विहीरीपासून दूर रहा व बिबट्याला बाहेर जायला जागा द्या.
- बिबट्या जखमी असेल तर ते पाण्यात बुडु नये याकरीता चारपाईला दोर बांधून ते विहीरीत पाण्यापर्यंत टाकावे.
- विहीरीजवळ गर्दी किंवा आरडाओरडा करु नका.
- वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत वाट पहा.
माणसावर हल्ला झाला असता…
- माहिती तपासून पहा.
- त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा.
- माहिती वनविभागाला द्या.
- लोकांना त्या ठिकाणापासून दूर ठेवा.
- लहान मुले व वयस्करांना घरात सुरक्षित ठेवा.
- प्राणी त्या क्षेत्रापासून दूर गेल्याची खात्री करा.
- त्या ठिकाणावरील प्राण्यांच्या अप्रत्यक्ष चिन्हाला प्राण्यांच्या माहितीसाठी तपासून पहा.
- प्राणी त्याच क्षेत्रात असू शकतो लोकांनी १-२ दिवसांसाठी त्या क्षेत्रापासून दूर रहावे.
वन्यप्राणी गावाजवळ किंवा रोडजवळ मेलेले आढळल्यास…
- वन्य प्राणी जिवंत आहे किंवा नाही हे दूरुन माहिती घेण्याचा प्रयत्न करा.
- त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा. वनविभागाला फोनद्वारे त्वरीत माहिती द्या.
- त्या प्राण्याचे कोणतेही अवयव काढू नका.
- वन्यप्राणी हलवू नका. त्यास पालापाचोळ्याने झाकून ठेवा.
- वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत वाट पहा.
जखमी वन्यप्राणी दिसल्यास… –
- वन्य प्राण्याजवळ कोणीही जाऊ नये. कोणीही दगड व काठ्यांनी मारु नये.
- लोकांना त्या प्राण्यापासून दूर ठेवा. गर्दी व आरडाओरडा होऊ देऊ नका.
- सुरक्षित अंतर ठेवा.
- वनविभागाला त्वरीत फोनद्वारे माहिती द्या.
- वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत त्या प्राण्याला छेडू नका.
वन्यप्राणी जाळ्यात फसल्यास. –
- वनविभागाला त्वरीत फोनद्वारे माहिती द्या.
- दगड अथवा काठीने मारु नका.
- त्या प्राण्याला डिवचू नका.
- त्या प्राण्याची सुटका करण्याचा प्रयत्न स्वतः करु नका.
- सुरक्षित अंतरावरुन प्राण्यांचे निरीक्षण करा. मदतीची वाट पहा.
- लोकांना दूर ठेवा. त्याचे छायाचित्र घ्या. वनविभागाची मदत करा.
फॉरेस्ट टोल फ्री क्रमांक : १९२६
विषबाधा मेलेल्या प्राण्यावर किंवा पाण्यात झाल्यास…
- मयत पक्षी/किडे पाण्याजवळ किंवा मयत प्राण्याजवळ आढळल्यास फोनद्वारे माहिती वनविभागाला द्या.
- पाण्याला व मयत प्राण्याला हात लाऊ नका.
- त्या क्षेत्राला झुडुपे व काटे लाऊन प्रतिबंधित करा.
- कोणताही प्राणी त्या प्राण्याजवळ व पाण्याजवळ जाऊ नये हे निश्चित करा कारण अन्य प्राणी विषबाधेचे शिकार होतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.