January 28, 2023
Leopart seen near village tips to care by forest department
Home » बिबट्या गावाजवळ दिसल्यास…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बिबट्या गावाजवळ दिसल्यास…

बिबट्या आपल्या परिसरात आढळल्यास किंवा अन्य वन्य प्राणी आपल्या राहत्या वसाहतीजवळ, गावाजवळ दिसल्यास कोणती काळजी घ्यायला हवी.? वन्य प्राण्यांची पिल्ले आढळल्यास काय करायला हवे ? याबाबत जाणून घ्या अजितकुमार पाटील यांनी दिलेल्या टीप्समधून

बिबट्या गावाजवळ आढळल्यास…

 • माहिती तपासून पहा.
 • फोनद्वारे वनविभागाला माहिती द्या.
 • दगडे व काठ्या मारु नका, बिबट हल्ला करु शकतो.
 • गावकऱ्यांना सतर्क करा व क्षेत्राला प्रतिबंधित करा.
 • वन्य प्राण्याजवळ गावकऱ्यांनी जाऊ नये.
 • प्राण्यांना घेरु नका.
 • गावकऱ्यांना सावध करा.
 • प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा.
 • रात्री पाळीव प्राण्यांना सांभाळा.
 • सूर्यास्तापासून व सुर्योदयापर्यंत बाहेर जाऊ नका.
 • वन्यप्राणी जाण्यापर्यंत त्या क्षेत्राचे निरीक्षण करा. 

बिबट्या गावात घुसल्यास…

 • माहिती तपासून पहा.
 • लोकांना प्राण्यांपासून दूर ठेवा.
 • त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा.
 • माहिती वनविभागाला द्या.
 • लोकांनी आपआपल्या घरात सुरक्षित राहावे.
 • लहान मुलांना व वयस्कर नागरिकांना प्राण्यांपासून दूर ठेवा.
 • कोणीही दगड व काठ्या मारु नये.
 • प्राण्यांना डिवचू नये. मोठ्याने आवाज करु नये.
 • सुरक्षित अंतरावरुन प्राण्यांचे निरीक्षण करा.
 • नोंदीकरीता दुरुन वन्यप्राण्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा. 

बिबट्याची पिल्ले गावाजवळ दिसल्यास…

 • माहिती तपासून पहा.
 • त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा.
 • पिल्लांना हात लावू नका.
 • फोनवरुन माहिती वनविभागाला द्या.
 • बिबट्याच्या पिलांना सुरक्षित ठेवा व लोकांना दूर ठेवा.
 • कुत्रे व इतर प्राण्यांना पिल्लांपासून दूर ठेवा.
 • त्यांना कोणतेही खाद्य देऊ नका.
 • दगडे व काठ्या मारु नका.
 • मदत येईपर्यंत सुरक्षित अंतरावरुन त्यांचे निरीक्षण करा.
 • कोणतीही अफवा/छायाचित्र पसरवू नका. 

बिबट्या घरात/गोठ्यात घुसल्यास…

 • घरातील लोकांना प्रथम बाहेर काढा.
 • घराचे दार बाहेरुन बंद करा.
 • वन्य प्राणी बाहेर जाऊ नये याची काळजी घ्या.
 • फोनद्वारे तात्काळ वनविभागाला माहिती द्या.
 • त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा.
 • आसपासचे लोक घरी सुरक्षित असल्याची काळजी घ्या, लोकांनी घराची दारे व खिडक्या बंद ठेवाव्यात.
 • लहान मुले व वयस्कर नागरीकांना दूर ठेवा.
 • स्वत:ला सुरक्षित ठेवा.
 • पाळीव प्राण्यांना वाचविण्याचा प्रयत्न करु नका.
 • जर गोठा बंद नसेल तर बिबट आपोआप निघून जाईल.
 • वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत दक्षता घ्या.

बिबट्या विहीरीत पडल्यास…

 • माहिती तपासून पहा.
 • त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा.
 • माहिती वनविभागाला द्या.
 • लोकांना त्या ठिकाणापासून दूर ठेवा.
 • लहान मुले व वयस्करांना दूर ठेवा.
 • विहीरीत शिडी व मोठे लाकूड टाका.
 • विहीरीपासून दूर रहा व बिबट्याला बाहेर जायला जागा द्या.
 • बिबट्या जखमी असेल तर ते पाण्यात बुडु नये याकरीता चारपाईला दोर बांधून ते विहीरीत पाण्यापर्यंत टाकावे.
 • विहीरीजवळ गर्दी किंवा आरडाओरडा करु नका.
 • वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत वाट पहा. 

माणसावर हल्ला झाला असता…

 • माहिती तपासून पहा.
 • त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा.
 • माहिती वनविभागाला द्या.
 • लोकांना त्या ठिकाणापासून दूर ठेवा.
 • लहान मुले व वयस्करांना घरात सुरक्षित ठेवा.
 • प्राणी त्या क्षेत्रापासून दूर गेल्याची खात्री करा.
 • त्या ठिकाणावरील प्राण्यांच्या अप्रत्यक्ष चिन्हाला प्राण्यांच्या माहितीसाठी तपासून पहा.
 • प्राणी त्याच क्षेत्रात असू शकतो लोकांनी १-२ दिवसांसाठी त्या क्षेत्रापासून दूर रहावे.

वन्यप्राणी गावाजवळ किंवा रोडजवळ मेलेले आढळल्यास…

 • वन्य प्राणी जिवंत आहे किंवा नाही हे दूरुन माहिती घेण्याचा प्रयत्न करा.
 • त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा. वनविभागाला फोनद्वारे त्वरीत माहिती द्या.
 • त्या प्राण्याचे कोणतेही अवयव काढू नका.
 • वन्यप्राणी हलवू नका. त्यास पालापाचोळ्याने झाकून ठेवा.
 • वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत वाट पहा. 

जखमी वन्यप्राणी दिसल्यास…

 • वन्य प्राण्याजवळ कोणीही जाऊ नये. कोणीही दगड व काठ्यांनी मारु नये.
 • लोकांना त्या प्राण्यापासून दूर ठेवा. गर्दी व आरडाओरडा होऊ देऊ नका.
 • सुरक्षित अंतर ठेवा.
 • वनविभागाला त्वरीत फोनद्वारे माहिती द्या.
 • वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत त्या प्राण्याला छेडू नका.

वन्यप्राणी जाळ्यात फसल्यास. –

 • वनविभागाला त्वरीत फोनद्वारे माहिती द्या.
 • दगड अथवा काठीने मारु नका.
 • त्या प्राण्याला डिवचू नका.
 • त्या प्राण्याची सुटका करण्याचा प्रयत्न स्वतः करु नका.
 • सुरक्षित अंतरावरुन प्राण्यांचे निरीक्षण करा. मदतीची वाट पहा.
 • लोकांना दूर ठेवा. त्याचे छायाचित्र घ्या. वनविभागाची मदत करा. 

फॉरेस्ट टोल फ्री क्रमांक : १९२६ 

विषबाधा मेलेल्या प्राण्यावर किंवा पाण्यात झाल्यास…

 • मयत पक्षी/किडे पाण्याजवळ किंवा मयत प्राण्याजवळ आढळल्यास फोनद्वारे माहिती वनविभागाला द्या.
 • पाण्याला व मयत प्राण्याला हात लाऊ नका.
 • त्या क्षेत्राला झुडुपे व काटे लाऊन प्रतिबंधित करा.
 • कोणताही प्राणी त्या प्राण्याजवळ व पाण्याजवळ जाऊ नये हे निश्चित करा कारण अन्य प्राणी विषबाधेचे शिकार होतात. 

Related posts

कोरोना काळातही कृषी क्षेत्रात उत्साहजनक वृद्धी

राखाडी रंगाच्या पाटीचा राखी वटवट्या…

चितळे ग्रुपच्या यशाचे गमक…

Leave a Comment