कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रसिद्ध झालेली पुस्तके येत्या १५ फेब्रुवारी, २०२४ पर्यत पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दमसाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह बेळगाव परिसरातील लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. देवदत्त पाटील पुरस्कार (कादंबरीसाठी), अण्णा भाऊ साठे पुरस्कार (कथा, ललितसाठी), शंकर खंडू पाटील पुरस्कार (कथासंग्रहासाठी), कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार ( वैचारिक, संशोधनासाठी ), शैला सायनाकर पुरस्कार ( कवितासंग्रहासाठी), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन पुस्तकासाठी) याबरोबरच बालवाडःमय पुरस्कारही देण्यात येतो.
तरी इच्छुक लेखक, प्रकाशक यांनी पुस्तकाच्या दोन प्रती , फोटो आणि परिचय अर्जासोबत १५ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, जी-६, स्मृती आपर्टंमेंट, बाबुजमाल रोड, सरस्वती टाँकीजवळ, कोल्हापूर ४१६०१२ या पत्यावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.