January 28, 2023
collector-announces-15-may-as-kolhapuri-chappal-day
Home » ”कोल्हापुरी चप्पल” घालूया.. कोल्हापूरची ओळख जपूया..! – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
काय चाललयं अवतीभवती

”कोल्हापुरी चप्पल” घालूया.. कोल्हापूरची ओळख जपूया..! – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

15 मे.. कोल्हापुरी चप्पल दिवस

कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतात राजर्षी छत्रपती शाहू महाराज.. कोल्हापूरची आई अंबाबाई.. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा.. कोल्हापूरचे मसाले.. आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे कोल्हापुरी चप्पल. राजर्षी शाहू महाराजांनी विविध कलांना प्रोत्साहन दिलं. राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत रविवार 15 मे रोजी ‘कोल्हापूरी चप्पल दिवस’ साजरा करण्यात येत आहे. 15 मे रोजी मी आणि माझे कुटुंबिय कोल्हापुरी चप्पल घालणार आहोत. तुम्ही सर्वजण देखील पारंपरिक वेषभूषेसह कोल्हापूरी चप्पल घालावे आणि कोल्हापूरची ओळख जपावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

चालणे होणार डौलदार.. व्यक्तिमत्व बनेल रुबाबदार

 ‘चप्पल लाईन’ येथे १३ ते १५ मे दरम्यान ‘कोल्हापूरी चप्पल प्रदर्शन आयोजित केले आहे. या माध्यमातून सर्व शाहू प्रेमींना कोल्हापुरी चप्पलेच्या कलाकुसरीचे प्रकार अनुभवता येणार आहेत.

कोल्हापूरकरांच्या भारदस्तपणाला आणखी रांगडेबाज बनवते ती कोल्हापुरी चप्पल.. डोक्याला कोल्हापुरी फेटा आणि पायात कोल्हापुरी चप्पल असली की समजायचं की गडी कोल्हापूरचा हाय. कोल्हापुरी चप्पलचे वैशिष्ट्य म्हणजे ही चप्पल हाताने बांधली जाते. त्यासाठी चप्पलचा अंगठा, करंगळीची वादी, वरचा बेल्ट याच्या अचूक बांधणीसाठी लेदरच्या सोलवर माप टाकून त्यानंतर पुढील कामे केली जातात. चप्पल बनवताना कलाकुसरीचे काम नजाकतपणे करावे लागते. बेल्टवरील जरीकाम, रेखीव वेण्या तसेच तळावरील नक्षीकाम हे खूप बारकाईने करावे लागते. हे नक्षीकाम करताना एकमेकांमध्ये समान अंतर राहील याची काळजी घ्यावी लागते.
कोल्हापुरी चप्पल बनवण्याचे हेच कसब, कौशल्य इथल्या मातीत विकसित झाले आणि यातूनच विकसित झाला ‘कोल्हापुरी चप्पल’ नावाचा ब्रँड. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राजाश्रयाने नावारूपास आलेल्या कोल्हापूरच्या चप्पलचे विविध प्रकार आणि कलाकुसर या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.

Related posts

न्यायालयाला छाननीचा निर्विवाद अधिकार

उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदुषण

नवी पिढी घडवण्याची प्रेरणा देणारा शोध काटेमुंढरीचा

Leave a Comment