मायेची हाक
ए आई……….
मी तर आहे तुझी लाडकी छकुली
मग कशाला करतेस
माझी हलाहली……?
आई म्हणताना…..
जीव सुखावतो
पण तुम्हाला मी नको
हे ऐकताना मात्र
जीव कालवतो….
ए आई. ……
तू पण आहेस एक बाई
मग कशाला करतेस
मला मारायची घाई……?
मला पण येऊ देत ना
या जगात…..
करशील एवढा उपकार
तू या युगात. …..?
माहित आहे मला. ….
नाही बनू शकत
मी वंशाचा दिवा
पण बनायला वंशाचा दिवा
तुला मुलगाच कशाला ग हवा…?
सांगू किती नावे. …
कल्पना चावला, इंदिरा गांधी
मग मलाही देना …..
त्यांच्यासारखे बनायची
एकच संधी….
सांग तू पप्पांना. ……
तुमची पण आई
एक मुलगीच बाई
सगळेजण करायला लागले
मुलींना मारायची घाई….
तर तूच सांग. ……..
या जगात……..
मुलाला जन्म द्यायला
मिळणार कशी ग आई. …?
सौ निर्मला कुंभार
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.