October 14, 2024
Call for Proposals for State Level Mahamrityunjaya Vangmay Awards 2022 and 2023
Home » Privacy Policy » राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२ आणि २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२ आणि २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२ आणि २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

गडचिरोली जिल्ह्यातील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२ आणि २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यश्री तर्फे गेल्या चोविस वर्षापासून विविध उपक्रम राबविण्यात येतात. यंदा साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

२०२२ च्या राज्यस्तरीय “महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कारासाठी जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेले आणि राज्यस्तरीय “महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२३ साठी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह, समीक्षा किंवा संपादन, नाटक किंवा आत्मकथन व संकिर्ण या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. रोख रक्कम,सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २ प्रती, अल्पपरिचय आणि पासपोर्ट फोटोसह प्रस्ताव ३० जून २०२४ पर्यंत पाठवावे, असे आवाहन संचालक/ संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी केले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
चुडाराम बल्हारपुरे (नाटककार) ,
महामृत्युंजय निवास, वार्ड क्रं. १७, राधे बिल्डिंगच्या मागे, चामोर्शी रोड,
गडचिरोली पिन- ४४२६०५ (म.रा.),भ्र.९६२३६६३४३५,


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading