गुलाबाचं फुल दे
तुझ्या हातून फक्त एकदा
गुलाबाचं फुल दे
आनंदाच्या लहरीमध्ये
मनाला या भिजू दे.
रंग म्हणशील तर
लालंच असू दे
प्रेमाच्या प्रतिकाचं स्वरूप
त्यात दिसू दे.
निमित्ताची तु कधि
वाट नको पाहूस
अन् उगीचच गुच्छ देऊन
भाव नको खाऊस.
भेटीला या तुझ्या
जीवापाड जपू दे
वाळलेल्या पाकळ्यांना
पुस्तकातंच लपू दे.
हवं तेव्हा मला त्यांना
डोळे भरून पाहू दे
तुझ्या माझ्या आठवणींना
प्रेमळ उजाळा मिळू दे
कवयित्री – सौ. अपर्णा पाटील