बचत गट ……..निर्मला कुंभार यांची अद्याक्षरावरून कविता
ब………..बचत होतच नसते मुळी
बायकांची
सवय त्यांची जोडून जोडून
पैसे साठवायची
पण साठतात का ……..?
च………चवली आणि पावली सुद्धा
देतो मग
तेव्हा पैशासाठी होते जीवाची
तगमग
मग त्यासाठीची त्यांची धडपड
दहा रुपयाचा गल्ला विकत
घ्यायची मग गडबड
त………तरीही लागले पैसे
की गल्ला फोडून बैसे
पैसा साठवायला आवडे फार
पण त्यासाठी मनात सारखा
विचार
ग………गजबजलेले आयुष्यात
मांडूया का विचारांचा थाट
सगळ्यांना एकत्र घेऊन पैसे
साठवायचा घाट
थोडे थोडे पैसे साठवून
करूया का एक प्रामाणिक कट
फक्त आपल्या स्वतःसाठीच
स्थापूया का एक बचत गट
ट……..टळेल मग ……..
पैसे साठवायची समस्या
गटाचे पैसे बँकेत ठेवून सार्थ
होईल मग आपली ही तपस्या
म्हणूनच सांगते. ……
बचत गटाची किमया न्यारी
यातूनच तयार होईल मग एक
सबला नारी…….
मग काय ………….
करूया का ……….
आत्तापासूनच आपण
बचत गटाची~
सुरुवात खरी…….. ?
सौ निर्मला कुंभार
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.