आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी सतर्क राहावे.असे आवाहन मुंबई येथील मंत्रालय नियंत्रण कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
शनिवार (दि. २४ ऑगस्ट) सकाळ ते सोमवार (दि.२६ ऑगस्ट) सकाळ पर्यन्तच्या ४८ तासात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, छत्रपती संंभाजीनगर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अश्या १४ जिल्ह्यात ह्या ४८ तासात अतिजोरदार पावसाचीही शक्यता जाणवते.
रविवार (दि. २५ ऑगस्ट) पासून सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होणाऱ्या जलविसर्गाच्या शक्यतेतून, संबंधित नद्यांच्या खोऱ्यात कदाचित पूर-परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.