ओसाका येथील जापनीज भाषा स्कूलमध्ये (इझूमीओत्सू) इंग्लिशच्या शिक्षिका म्हणून रूजू होत असून ही निवड दीड वर्षांकरीता आहे. शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी पदवी जाहीर झाल्यानंतर याच संस्थेत प्राध्यापक म्हणून रूजू होणार आहे.
मेघा कांबळे, शिक्षिका, जापनीज भाषा स्कूल, ओसाका (इझूमीओत्सू)
- जापनीज शिक्षिका मेघा कांबळे यांची माहिती
- शिवाजी विद्यापीठात हिंदीच्या विद्यार्थ्यांशी संवाद
कोल्हापूर ः मराठी-हिंदी भाषेचे जापनीज भाषेशी साधर्म्य असल्या कारणाने जापनीज शिकणे आणि शिकविणे खूप सोपे आहे. यामुळे मराठी-हिंदीच्या विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या वाटा धुंडाळताना विदेशी भाषांना अवगत करणे गरजेचे आहे, असे मत मेघा कांबळे यांनी व्यक्त केले.
कांबळे यांची इझूमीओत्सू येथे इंग्लिशच्या शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. त्या शनिवारी जपानला रवाना झाला. यापूर्वी शुक्रवारी हिंदी विभागात आयोजित शुभेच्छा समारंभात भाषेच्या विद्यार्थांना विदेशात रोजगाराची संधी या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी भाषेच्या विद्यार्थांसाठी जपानमध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कांबळे यांनी विशेष प्रयत्न करावे, अशी अपेक्षा प्र. विभागाध्यक्ष डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. प्रकाश मुंज यांनी केले. आभार डॉ. गीता दोडमणी यांनी मांडले. यावेळी डॉ. संतोष कोळेकर, प्रा. अनिल मकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थींनीची जपानकडे झेप
शिवाजी विद्यापीठातील इंग्लिशची संशोधक विद्यार्थीनी मेघा कांबळे यांची जपानमध्ये जापनीज भाषा स्कूलमध्ये (ओसका, इझूमीओत्सू) शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. मेघा कांबळे यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.ए. इंग्लिशची पदवी घेतली आहे. त्यांचे लिटररी टूर्मा स्टडिज विषयावरील पीएच.डी.चे संशोधन अंतिम टप्प्यात आहेत. यासाठी त्यांना एससीची राष्ट्रीय फेलोशीप मिळाली आहे. त्या नेट उत्तीर्ण ही आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून जर्मन व जापनीज भाषेंचा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केला आहे. याचबरोबर जपानीज भाषेची व्यावसायिक टेस्ट (जेएलपीटी) एऩ5, एऩ4 उत्तीर्ण आहेत. जेएलपीटी एऩ3 ची तयारी सुरू आहेत.जपानी आणि मराठी भाषांमधील विरोधाभास विषयावर त्यांनी एम.ए.चा प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. तसेच ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या मराठी-इंग्लिश शब्दकोशसाठी त्यांनी सहायक म्हणून काम केले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीची जपानमध्ये शिक्षण व नोकरीसाठी निवड
शिवाजी विद्यापीठाच्या, मेघा कांबळे या इंग्रजी विभागाच्या संशोधक विद्यार्थिनीची जपानमध्ये अभ्यास आणि नोकरी करण्याच्या प्रतिष्ठित संधीसाठी निवड झाली आहे. तिच्या संशोधन मार्गदर्शक, प्रा. तृप्ती कारेकट्टी यांचे मार्गदर्शन व मेघाची मेहनत, समर्पण आणि मराठी-जपानी भाषांच्या संशोधन क्षेत्रातील आस्था यामुळे तिला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तिची कारकीर्द घडवण्याची ही अपवादात्मक संधी मिळाली आहे. मेघा ओसाकामध्ये तिच्या उर्वरित जपानी स्तरांचा अभ्यास करेल आणि त्यानंतर कामाला सुरुवात करेल.
त्यानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी मेघाचे अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी तिला हस्तलिखित वैयक्तिक संदेशासह एक पुस्तकही भेट दिले. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आणि जागतिक स्तरावर संस्थेचे प्रतिनिधित्व करत या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तिला प्रोत्साहित केले.
मेघाची निवड ही शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या दर्जेदार शिक्षणाचा आणि मार्गदर्शनाचा पुरावा आहे. हिंदी विभागानेही भाषेच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी ‘भाषा विद्यार्थ्यांसाठी परदेशी करिअरच्या संधी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तिने भाषेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करिअरच्या संधी, भाषा कौशल्ये आवश्यक असलेल्या विविध संधी शोधण्याचे मार्ग आणि जपानमधील जीवनशैली याविषयी सांगितले. तिची यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात जागतिक स्तरावर ओळख मिळवण्यासाठी प्रेरित करेल अशी अपेक्षा आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.