January 29, 2023
Promotion of export of honey for a sweet revolution
Home » मधुर क्रांतीसाठी मधाच्या निर्यातीला प्रोत्साहन…
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मधुर क्रांतीसाठी मधाच्या निर्यातीला प्रोत्साहन…

मधाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, राज्ये आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने केंद्र सरकार करणार अनेक उपक्रमांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वीट रेवोल्युशन (‘sweet revolution’) अर्थात मधुर क्रांतीच्या संकल्पनेला अनुसरून मधाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी मधुमक्षिकापालन आणि यासंबंधीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रमांची मालिका आयोजित करणार आहे.

मधाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे हेतूने अशाच प्रकारचा एक उपक्रम वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या  अपेडा(APEDA) या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केला जाणार आहे.  यात निर्यातदार,भागधारक आणि सरकारी अधिकारी सहभागी होणार असून देशातल्या शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रवृत्त करणे आणि त्यातून गुणवत्तापूर्ण मधाची निर्मिती करणे हा हेतू आहे.

नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणारा मधाचा गुणधर्म आणि साखरेला एक आरोग्यदायी पर्याय म्हणून कोविड 19 महामारीच्या काळानंतर मधाच्या वापरात वाढ झाली हे लक्षात घेता, अपेडा ने उत्तम मध निर्मिती करून मध निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं आणि नवीन देशात आपली बाजारपेठ वाढवण्याचं ठरवलं आहे. सध्याच्या काळात भारतातल्या नैसर्गिक मधाची निर्यात ही केवळ एकाच देशातल्या बाजारावर अवलंबून आहे आणि ती म्हणजे अमेरिका. या बाजारपेठेत भारतातील  80 टक्के मधाची निर्यात होते.

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अंतर्गत मधाचं उत्पादन वाढावं याकरता सरकारने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध मोहिमेकरता (NBHM) येत्या तीन वर्षासाठी (2020-21 to 2022-23) पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून मधाचं आयुर्वेदामधलं महत्त्व स्पष्ट केलं आहे. मधाचे अमृत असे वर्णन करण्यात आले आहे. मध निर्मिती मधून अनेक संधी उपलब्ध होतील आणि आजचा युवक सुद्धा या क्षेत्राचे अद्ययावत ज्ञान घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

गुणवत्तापूर्ण मधाची निर्यात वाढावी याकरिता आम्ही राज्य सरकारे, शेतकरी आणि इतर भागधारक यांच्याशी संपर्कात  आहोत असे अपेडाचे संचालक डॉक्टर एम अंगमुथू यांनी म्हटले आहे. मधाची निर्यात वाढावी याकरिता  काही देशांकडून लावण्यात आलेल्या शुल्क संरचनेत नव्याने वाटाघाटी करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताने 1996- 97 मध्ये पहिल्यांदा नैसर्गिक मधाच्या निर्यातीला सुरुवात केली आणि वर्ष 2021- 22 पर्यंत ही निर्यात 74,413 (MT) मेट्रिक टन एवढी वाढली असून त्यापासून 163.73 दशलक्ष अमेरिकी डॉलर  एवढं उत्पन्न मिळाले आहे. अमेरिकेनंतर, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, नेपाळ, मोरोक्को ,बांगलादेश आणि कतार या भारतीय मधाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. वर्ष 2020 मध्ये   7.36 lakh MT लाख मेट्रिक टन एवढी मधाची, विक्रमी निर्यात झाली. मध निर्मिती आणि मध निर्यात करणारे देश यात जागतिक पातळीवर अनुक्रमे भारताचा आठवा आणि नववा क्रमांक आहे.

भारतामध्ये महाराष्ट्र आणि ईशान्येकडचा प्रदेश हे प्रमुख मध निर्मिती करणारे भाग आहेत. आपल्या देशात निर्माण होणाऱ्या मधापैकी  50% मध हा देशातच वापरला जातो आणि उरलेला मध निर्यात केला जातो. डीजीसीआयएसच्या(DGCIS) माहितीनुसार, अपेडाने एप्रिल – जून 2022 मध्ये 7.41 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढ्या मधाची निर्यात केली आहे , यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 30.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Related posts

टाकावू वस्तूपासून सजवली सुंदर बाग…(व्हिडिओ)

पिंपळाचे झाड अन् शेतातील पिकांचे कीड नियंत्रण !

प्रचितीगडावर जाण्यासाठी उभारली शिडी !

Leave a Comment