April 25, 2024
Residue free farm Production book by Mandar Mundale
Home » विषमुक्त शेती उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विषमुक्त शेती उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शक

सध्या आरोग्यदायी, विषमुक्त शेतमाल विषयाचे महत्व वाढते आहे. अशा उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी आहे. अन्न सुरक्षितता (फूड सेफ्टी) हा विषय संपूर्ण जगाच्या अजेंड्यावर आहे. कोरोना संकटानंतर तर जागतिक अर्थकारणच ढवळून गेले आहे. जगभरातील ग्राहक कधी नव्हे एवढा सुदृढ आरोग्य, प्रतिकारशक्ती व सकस अन्न याबाबत काटेकोर झाला आहे. त्यामुळे रासायनिक अवशेषमुक्त अन्नाला जगभर मागणी वाढत राहणार हे उघड आहे. भारताने ग्रेपनेटबरोबर अनारनेट, व्हेजनेट आदी विविध पिकांसाठी ट्रेसेबिलीटी यंत्रणा तयार करून रासायनिक अवशेषमुक्त शेतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे.

भारताला आदर्श शेती पध्दती (गूड ॲग्रीकल्चरल प्रॅक्टीसेस) व ट्रेसेबिलिटी यांची सांगड घालून जागतिक बाजारपेठेत मोठा हिस्सा मिळवण्याची संधी आहे. पण यासाठी रेसिड्यु फ्री शेती उत्पादन घेणे महत्त्वाचे आहे. यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरावे या उद्देशाने सकाळ-  ॲग्रोवन दैनिकाचे उपमुख्य उपसंपादक मंदार मुंडले यांनी `रासायनिक असो वा सेंद्रिय, शेती रेसिड्यू फ्रीच` हे पुस्तक लिहीले आहे.

सकाळ प्रकाशनतर्फे प्रकाशित या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, ॲॅग्रोवनचे संपादक संचालक आदीनाथ चव्हाण व कृषी विभागाच्या निर्यात कक्षाचे सल्लागार व तज्ज्ञ गोविंद हांडे यांच्या हस्ते झाले. शेतकरी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी व पणन, अन्य  विभागाचे अधिकारी, खाजगी कंपन्या, कृषी सेवा केंद्रे, अभ्यासक, प्रमाणीकरण अधिकारी, निर्यातदार आदी सर्वांना उपयोगी ठरावे असे हे पुस्तक आहे. केवळ पुस्तकी वा थेअरॉटीकल ज्ञान नाही तर प्रॅक्टीकली ज्ञानावर आधारीत माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

‘रेसिड्यू फ्री’ शेती करताना लेबलक्लेम, पीएचआय, एमआरएल याबाबी महत्त्वाच्या आहेत. द्राक्षात याबाबत मोठे काम झाले आहेत. मात्र हा विषय व्यापक असून द्राक्षाप्रमाणेच अन्य पिकासाठीही असे संशोधन होणे गरजेचे आहे. आपली शेती अधिक व्यावसायिक, अधिक उत्पादनक्षम आणि विषमुक्त कशा प्रकारे राहील यासाठी प्रयत्न करत राहावे लागणार आहे. पुस्तकांत याविषयाची दिलेली मूलभूत माहिती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल.

– डॉ. एस. डी. सावंत

कुलगुरु,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली


जगात अमेरिका, कॅनडा या देशांत रासायनिक घटकांचा वापर अधिक आहे, परंतु तेथील उत्पादनात उर्वरित अंशाचे प्रमाण कमी आहे. या तुलनेत भारतात रासायनिक घटकांचा वापर कमी असला, तरी उर्वरित अंशाचे प्रमाण खूप अधिक आहे. यामुळे रेसिड्यू फ्री शेतीचे महत्त्व वाढले आहे. या आनुषंगिक पुस्तकात चांगली माहिती दिली आहे.

– गोविंद हांडे

कृषी निर्यात सल्लागार  

जगाला सकस अन्न पुरवताना शेतकऱ्याला आपल्या कुटुंबाचे आरोग्यही जपायचे आहे. शेतीतील नवी पिढी अधिक महत्वाकांक्षी आहे. या तरूणाईला ज्ञानाची भूक आहे. मार्गदर्शनासह त्यांना प्रोत्साहन व धीर देण्याची गरज आहे. रासायनिक अवशेषमुक्त शेतीत योग्य सल्लागार व त्यातही या विषयाला वाहिलेल्या साहित्याची संख्या तुलनेने कमी आहे. अशावेळी रासायनिक असो वा सेंद्रिय, शेती रेसिड्यू फ्रीच’ हे पुस्तक मार्गदर्शक म्हणून कायमस्वरूपी साथ देईल अशी मला खात्री आहे.

–  आदीनाथ चव्हाण

संपादक, ॲग्रोवन


पुस्तकात प्रकाश टाकण्यात आलेले विषय

  • ‘रेसीड्यू फ्री’ शेतीची संकल्पना, ‘फूड सेफ्टी’, ट्रेलेबिलिटी यांचे महत्व
  • रासायनिक शेती व सेंद्रिय शेतीतील फरक, ऑरगॅनिक शब्दाचा नेमका अर्थ
  • पीएचआय व एमआरएल यांचे महत्व
  • केंद्र सरकारची ऑनलाईन रेसीड्यू मॉनिटरिंग सिस्टीम
  • राज्यातील महत्वाच्या किडी व रोगांचे आव्हान, काही किडी- रोग व तणांची शास्त्रीय नावे.
  • सीआयबीआरसी’ मान्यताप्राप्त आधुनिक पिढीतील रासायनिक, सेंद्रिय कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांची नावे. पीएचआय सहित. बंदी आलेल्या कीडनाशकांची यादी, बंदीमागील कारणे
  • पेस्टीसाईड मॅनेजमेंट बील, २०१७- ठळक बाबी
  • कीडनाशकांप्रति प्रतिकारक्षमता विकसित होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर संमत ‘मोड ऑफ ॲक्शन’ कार्यपध्दती व चार्टस
  • मधमाशा व कीडनाशकांचा सुरक्षित वापर, मधमाशांना हानीकारक कीडनाशकांची यादी
  • ग्लोबलगॅप व सेंद्रिय शेती प्रमाणीकरण.
  • जागतीक दृष्ट्या जीएम पिके, त्यातील आधुनिक तंत्रज्ञान
  • रेसिड्यू फ्री शेतीच्या अनुषंगाने निवडक शेतकऱ्यांच्या यशकथा
  • स्पेनमधील जगप्रसिध्द रेसीड्यू फ्री शेती (प्रत्यक्ष पाहणीवर आधारीत)
  • वेदर स्टेशन्सचे महत्व.  
  • सेंद्रिय उत्पादनांचे मूल्यपरिक्षण  
  • वाढ उत्तेजके (बायो स्टिम्युलंटस) निविष्ठांविषयी.  
  • कीडनाशकांचा सुरक्षित वापर, पिक्चोग्राम्स 

पुस्तकाचे नाव – रासायनिक असो वा सेंद्रिय, शेती रेसिड्यू फ्रीच’
लेखक – मंदार मुंडले
प्रकाशक – सकाळ प्रकाशन
पृष्ठे – ३५२ किंमत – 500 रुपये ( सवलतीचा दर पोस्टल खर्चासह – 485 रुपये )
पुस्तकासाठी संपर्क – 9881307294 (व्हाट्सअॅप)

Related posts

एअर कार्गो संकुलातील आयात सामानामध्ये सापडले विदेशी प्रजातीचे 665 प्राणी 

Dnyneshwari : कर्मापासून अलिप्त अशा आत्म्याला जाणणे !

मुलांनो, चला तर करूया गांडुळाशी मैत्री

Leave a Comment