May 23, 2024
Shabdagan Award by Dr Ananta Soor
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तेरा वर्षापासून हे साहित्य पुरस्कार देण्यात येत असून पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे. तरी साहित्यिकांनी साहित्यकृती पाठवाव्यात असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंता सूर यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

या वर्षीच्या पुरस्कारासाठी जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन आणि आत्मकथन या साहित्य प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात आले आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, अल्पपरिचय आणि पासपोर्ट फोटोसह प्रस्ताव केवळ पोस्टानेच (कुरीयरने पाठवू नये) डॉ. अनंता सूर (भ्र.९४२१७७५४८८), कल्पना मार्बलमागे , छोरीया ले आऊट, गणेशपूर( वणी ), ता. वणी,जि. यवतमाळ पिन ४४५३०४ या पत्त्यावर ३० मे २०२३ पर्यंत पाठवावे. असे आवाहन संस्थेतर्फे केले आहे.

Related posts

अमरत्वाचे सिंहासन कोणाला मिळते ?

स्वःचा विसर हे अज्ञानाचे रुप

गोर बोली भाषा संवर्धनाची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406