कोल्हापूर – शहरातील बाबा जरगनगर येथील श्री गजानन प्रतिष्ठानच्यावतीने २०२४ या सालातील उत्कृष्ट शब्दांगण कवितासंग्रह आणि उत्कृष्ट शब्दांगण कादंबरी पुरस्कार देण्यात येणार आहेत.
लेखिका शोभा राऊत यांनी केलेल्या आवाहनानुसार शब्दांगण कादंबरी पुरस्कार रुपये १००१, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच “शब्दांगण काव्य पुरस्कार” रुपये १००१, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे प्रौढ वाङ्मयासाठी पुरस्काराचे स्वरूप आहे.
तर नवोदितांना प्रोत्साहनपर पुरस्कार म्हणून “शब्दांगण” पुरस्कार” रुपये १००१ व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मात्र यासाठी फक्त प्रथम प्रकाशन असलेल्या साहित्य प्रकारालाच पुरस्कार दिला जाईल.
इच्छुक प्रकाशक आणि लेखकांनी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळातील कादंबरीची व कवितासंग्रहाची प्रत ३० जून २०२५ पूर्वी पाठवावी.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता: सौ. शोभा सतीश राऊत, ‘शब्दांगण ‘ प्लॉट नंबर 17/2, ले आउट नंबर 1, जरगनगर, कोल्हापूर 416007 फोन : 9923897898
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.