March 23, 2023
Shree Shabda kavya puraskar by Chandrakant Potdar
Home » ‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठवण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठवण्याचे आवाहन

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी आवाहन

कोल्हापूर – कै.सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृति प्रित्यर्थ गेली काही वर्षे कवितासंग्रहाला ‘श्रीशब्द ‘ पुरस्कार दिले जातात. याहीवर्षी असे पुरस्कार दिले जाणार आहेत. तरी इच्छुकांनी कवितासंग्रह पाठवावेत, असे आवाहन कवी चंद्रकांत पोतदार यांनी केले आहे.

1100 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्फूर्ती साहित्य संघाच्यावतीने नेज (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रकाशित कवितासंग्रहाच्या दोन प्रती कवींनी अथवा प्रकाशकांनी 31 मार्च 2022 पर्यंत पाठवायच्या आहेत, असे आवाहन संघाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले आहे.

कविता संग्रह ३१ मार्च पूर्वी कवी चंद्रकांत पोतदार, मु. पो. मजरे कारवे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर 416507 मोबाईल – 9423286479 या पत्त्यावर पोहोच करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

हवामान बदल चळवळीविषयी सार्थक संवाद सुरु करण्याचा हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन मधून प्रयत्न

भय इथले संपत नाही !..

दानापूर येथे रविवारी मराठी बोली साहित्य संमेलन

Leave a Comment