शिराळा – तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पणुंब्रे वारुण यांच्या वतीने या राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्काराची घोषणा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी वसंत पाटील यांनी केली.
उद्योजक बळीराम पाटील चरणकर उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार सुनील यावलीकर अमरावती यांच्या’ काया वाचा मने ‘ या कादंबरीला, शब्दरंग डोंगरी साहित्य पुरस्कार किरण भावसार सिन्नर यांच्या ‘घामाचे संदर्भ’ या कवितासंग्रहास तर प्रगतशील शेतकरी कै. निवृत्ती डफळे साहित्य पुरस्कार महादेव माने खंडोबाचीवाडी यांच्या ‘ वसप ‘ या कथासंग्रहाला तर सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील पुरस्कार प्रा. भीमराव धुळूबुळू मिरज यांच्या ‘ काळजाचा नितळ तळ ‘ या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे.
तसेच विशेष पुरस्कारामध्ये सुरेश आडके कणेगाव यांच्या ‘सौंदड ‘या कथासंग्रहाची आणि सुभाष कवडे भिलवडी यांच्या ‘प्रकाशपेरणी’ या कविता संग्रहाची निवड झाली आहे.
पुरस्कार स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. पुरस्कार वितरण मार्च २०२५ मध्ये पणुंब्रे वारुण येथे होणाऱ्या १३ व्या डोंगरी साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती कवी वसंत पाटील यांनी दिली. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष हणमंतराव पाटील, कोषाध्यक्ष सचिन पाटील, सचिव मन्सूर नायकवडी आदी प्रमुख कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.