जगातील तीन प्रमुख कापूस उत्पादक देश - भारत, अमेरिका, चीन दरवर्षी भारतात सरासरी ५७७० हजार मेट्रीक टन कापूस उत्पादन होते. अमेरिकेत दरवर्षी सरासरी ३९९९ हजार मेट्रीक टन कापूस उत्पादन होते.
सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठी कोंडी झाली आहे. कापूस विकायचा की ठेवायचा या द्विधा मनस्थितीत शेतकरी आहे. कापसाचे भाव वाढतील या आशेने कापूस शेतकऱ्यांनी साठवण करून ठेवला, पण आता शेतकऱ्यांचा कापूस थांबवण्याचा जो काही प्रकार आहे, त्याची शक्ती संपली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याने थोडे थोडे विकायला सुरुवात केली आहे. जसा जसा तो कापूस विकतो आहे तसे बाजारात कापसाचे भाव पडत आहेत. याची दोन कारणे आहेत. यावर्षी मागच्यावर्षी प्रमाणे १२ हजार रुपये, दहा हजार रुपये, १४ हजार रुपये असा भाव मिळणार नाही. याचे कारण फार स्पष्ट होते. मागच्यावर्षी अमेरिकेत १. ७० डॉलर पर्यंत कापसाचा भाव झाला होता. तो यावर्षी एक डॉलरपर्यंत खाली आला आहे. यंदा कापूसचा भाव आठ हजार ते साडे आठ हजार रुपयांच्या आसपास राहाणार आहे असे आम्ही यापूर्वी सांगितले होते. मध्यंतरी सरकीचे भाव वाढले तसे कापसाचे भाव वाढायला लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस थांबून ठेवला होता.
सोयाबीनच्या भावातही वाढ होईल अशी आशा होती पण ती सुद्धा झाली नाही. आता तर अशी कोंडी झाली आहे की सोयाबिनचे भावही पडत आहेत आणि कापसाचे भाव पडत आहेत. याचं कारण असं आहे जगात भावच नाही. आजचा अमेरिकेतील कापसाचा भाव ०.९६ आहे. म्हणजे एक डॉलरच्या खाली घसरला आहे. त्याच्यामुळे आज रुईचे भाव ही घसरले आहेत. 65 हजार खंडीची रुई अमेरिकेच्या बाजारात 60 हजार रुपये खंडीपर्यंत आलेली आहे. सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. कारण सोयाबिनचा भाव जगाच्या बाजारात १४ डॉलर ते १४.५ डॉलर प्रति बुशेल या स्तरावर आहे. जो मागच्यावर्षी पंधरा हजार डॉलर ते 16 डॉलर पर्यंत होता आणि त्याच्यामुळे सोयाबीनच्या ढेपीचे भावही पडले. साहजिकच खाद्य तेलाचे भावही घसरले.
भारतातील सोया प्रोसेसर संघटनेने खाद्यतेलावर २० टक्के आयातकर लावावी अशी मागणी केली आहे. यासाठी सुरवातीपासून कापस निर्यातीला अनुदान दिले जावे अशी मागणी वारंवार करत आहोत. कारण या शिवाय कापूस निर्यात होऊ शकत नाही. कारण देशात ६१ हजार ते ६२ हजार खंडी रुईचा भाव आणि जगात ६० हजार खंडी रुईचा भाव आहे. त्याच्यामुळे या सगळ्यामुळे आता कापसामध्ये पुन्हा तेची येईल असे वाटत नाही. शेतकऱ्यांनी हळूहळू कापूस विकायला सुरुवात केली पाहिजे आणि काही अघटीतच घडलं आणि अमेरिकेत पुन्हा एक डॉलच्यावर भाव गेले आणि सरकीचे भावही वाढले. तर चार-पाचशे क्विंटलची तेजी येऊ शकते. पण तेवढावेळ कापूस विकायचे थांबायची शेतकऱ्यामध्ये क्षमता नाही. त्यातच उन्हाळा आहे. कापूस घरामध्ये ठेवणे धोक्याचे आहे. उन्हामध्ये कापूस तुटतोही यामुळे नुकसान होते याचाही विचार करायला पाहीजे. एकदंर यावर्षी कापूस उत्पादकांची कोंडी झाली आहे, हे मान्य करायला हवे. कापसाची कोंडी फोडण्यासाठी निर्यातीवर अनुदान देण्याचा विचार सरकारने करायला हवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.