April 26, 2024
vittalrao-kedar-literature-award-devulwadi-udgir
Home » विठ्ठलराव केदार साहित्य पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

विठ्ठलराव केदार साहित्य पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

विठ्ठलराव केदार राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन उदगीर येथील विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

उदगीरच्या विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने कै. विठ्ठलराव केदार राज्यस्तरीय मराठी वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार यांनी केले आहे.

यासाठी 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित कलाकृती या पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कथासंग्रह, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट काव्यसंग्रह, उत्कृष्ट समीक्षा/वैचारिक ग्रंथ या वाङ्मय प्रकारास प्रत्येकी दोन हजार रुपये शाल श्रीफळ व मानपत्र देण्यात येतील.

तरी संबंधितांनी पुस्तकाच्या दोन प्रती ,अल्प परिचय , एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र 30 मार्च 2023 पर्यंत विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार ” ज्ञानेश्वरी “मु. पो. देऊळवाडी, ता. उदगीर, जि. लातूर – 413532 या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे. पुरस्काराच्या संदर्भात अधिक माहितीसाठी 9604354856 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी केले आहे.

Related posts

गांडुळ अन् गांडुळ खताचे फायदे

कमी उजेडात वाढणाऱ्या वनस्पती…

ज्ञानेश्वरीसह गीता तत्त्वज्ञान नित्य नुतन

Leave a Comment