November 21, 2024
With proper planning forest guards removed the Gava from the canal
Home » योग्य नियोजनातून वनरक्षकांनी गव्याला कालव्यातून काढले बाहेर…
काय चाललयं अवतीभवती

योग्य नियोजनातून वनरक्षकांनी गव्याला कालव्यातून काढले बाहेर…

गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी वनविभाग सतर्क आहे. योग्य नियोजनातून गव्याला नागरीवस्तीतून जंगलात सोडण्यासाठी सतत प्रयत्नात असते. रिळे येथे कालव्यात अडकलेल्या गव्याला सुखरुप बाहेर काढून आदिवासात सोडले.

अजितकुमार पाटील

रिळे (ता. शिराळा) येथील ग्रामस्थांना सकाळी आठच्या दरम्यान खंडोबा मंदिराच्या परिसरात गव्याचे दर्शन झाले. या गव्याला माणसांची चाहूल लागताच त्याने फुफेरे फाटा नजीक असणाऱ्या शेत शिवाराकडील कालव्याकडे धाव घेतली. रिळे येथील वारणा डावा कालव्यात हा गवा खाली उतरला. हा मुख्य कालवा असल्याने, त्यातून गवा बाहेर पडू शकतं न्हवता. गवा आल्याची बातमी परिसरात पसरल्याने रिळेसह परिसरातील अनेक नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी व कालव्यातून बाहेर काढण्यासाठी गर्दी केली.

लोकांच्या गर्दीला व आवाजाला घाबरून हा गवा कालव्यामधून पुढे सरकत रिळे गावा नजिक असलेल्या डाव्या कालव्याच्या जलसेतू (aqueduct)मधून पुढे शिराळे खुर्द-फुपरे गावच्या हद्दीवरील पावले वस्तीनजीक पोहोचला होता. या बाबतची माहिती नागरिकांनी वन विभागाला कळवली होती त्यामुळे वन रक्षक हणमंत पाटील व प्रकाश पाटील हे वन मजुरा सोबत घटनास्थळी पोचले व गव्या पासून लोकांना दूर ठेवले. कालव्यातून बाहेर पडण्यासाठी गवा प्रयत्न करत होता.

वन कर्मचाऱ्यांनी लाईव्ह लोकेशन घेतले व जागेचा आढावा घेतला. मधेच असलेला छोटा बोगद्या पार करून गवा पुढे सरकला होता. गुगल मॅपवर पाहिले असता पुढे एक मातीचा बांध होता तिथपर्यंत गवा जाईल व त्यातून तो सुखरूप बाहेर येईल असं नियोजन फोनवरून करण्यात आले. कालव्यात झाडी नसल्याने सावली अजिबात नव्हती. उन्हाचा ताव त्यामुळे गवा पूर्ण दमला होता. मातीचा बांध पार करून बाहेर जात असताना लोकांना पाहून तो परत कालव्यात उतरला. लोकांना दूर करत गावाच्या विरूद्ध बाजूला असलेल्या काठाने गवा वर चडून येईल असे नियोजन केले व जागा निर्मनुष्य केली गेली. गवा काही वेळातच कालव्यातून बाहेर आला व जंगलाचे निरिक्षण करत सुखरूप निघून गेला.

काही दिवसापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या दोन घटनात , गव्याला हुसकत असताना हल्ले झाल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. अशा घटनेची पुनरावृत्ती सांगली जिल्ह्यात होवू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेत या गव्याला न दमवता किंवा न भीती दाखवता त्याच्या मर्जीने कालव्यातून सुखरूप बाहेर काढण्यात, वन विभाातर्फे बिळाशीचे वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक पी. एन .पाटील, हनुमंत पाटील आदींसह अमर पाटील, तानाजी यांनी जागेवर नियोजनपूर्वक काम केलं.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading