- १० सप्टेंबरला आनंदवनात होणार पुरस्कार वितरण
चंद्रपूर – झाडीपट्टीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, बोली भाषेवर उत्तम लेखन व्हावे, बोलीच्या वैशिष्ट्याचे जतन व संवर्धन व्हावे, लिहित्या हाताना बळ मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे झाडी शब्दसाधक पुरस्कार दिले जातात.
यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे साहित्यिकांची निवड केलेली आहे. त्यामध्ये प्रा. नामदेव मोरे (चंद्रपूर), प्रकाश कोडापे (चिमूर), जयंत लेंजे (सिंदेवाही), शितल कर्णेवार (राजुरा), सुनील बावणे (बल्लारपूर), मंगला गोंगले (सावली), वृंदा पगडपल्लीवार (मुल), डॉ.अर्चना जुनघरे (जिवती), सुजित हुलके (पोंभुर्णा), संगीता बांबोळे (गोंडपिपरी), धनंजय पोटे (ब्रह्मपुरी), महादेव हुलके (कोरपना), कु. वंदना बोढे (भद्रावती), विजय भसारकर (वरोरा) यांची शब्द साधक पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर निवड समितीने केलेली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या दहा सप्टेंबरला आनंदवन येथील शांतिनिकेतन निजबल हॉल येथे डॉ. विकास आमटे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सुधाकर कडू, आचार्य ना. गो. थुटे, जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, प्राचार्य रत्नमाला भोयर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या झाडी शब्दसाधक पुरस्कार सोहळ्याकरिता जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन झाडीबोली साहित्य मंडळ वरोरा शाखेचे तालुकाध्यक्ष कवी पंडित लोंढे यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.