गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचतर्फे साहित्य पुरस्कार – 2021ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १४ एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता. भुदरगड ) येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे अशी माहिती मंचाचे अध्यक्ष राजन कोनवडेकर आणि उपाध्यक्ष डाॅ. अर्जुन कुंभार यांनी दिली आहे.
अक्षरसागर साहित्य मंचातर्फे देण्यात आलेले पुरस्कार असे –
उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
1) इपळाप (कादंबरी) – नंदू साळोखे
2) सारिपाट (कथासंग्रह) – अंकुश गाजरे
3) दखल बेदखल (काव्यसंग्रह) – शिवाजी सातपुते
4) थांब ना रे ढगोबा (बालकाव्य) – राजेंद्र उगले
विशेष साहित्य पुरस्कार
1) ऊसकोंडी (कादंबरी) – श्रीकांत पाटील
2) नोटबंदी (कथासंग्रह) – दि.बा.पाटील
3) गझलनाद (गझलसंग्रह) – सिराज शिकलगार
4) रानपाखरं (बालकाव्य) – मालती सेमले
5) आठवणींच्या हिंदोळ्यावर – अश्विनी व्हरकट (तालकास्तरीय पुरस्कार)
6) आजीनं सांगीतलेल्या गोष्टी – कु. श्रावणी पाटील (विशेष बालसाहित्यिका पुरस्कार)
14 एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता. भुदरगड ) पहिल्या अक्षरसागर ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आप्पासाहेब खोत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याच हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी सुदेश सापळे, अमर देसाई, सचिव बा. स. जठार, खजानिस डी. व्ही. कुंभार, डाॅ. मा. ग. गुरव, प्रा. राणी हुजरे, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.