December 12, 2024
Astrosat UVIT telescope captures astronomical explosion in the Andromeda galaxy
Home » युव्हीआयटी दुर्बिणीने टिपला ऍन्ड्रोमेडा आकाशगंगेतील खगोलीय विस्फोट
संशोधन आणि तंत्रज्ञान

युव्हीआयटी दुर्बिणीने टिपला ऍन्ड्रोमेडा आकाशगंगेतील खगोलीय विस्फोट

ऍस्ट्रोसॅट या अंतराळ खगोलशाळेवरील युव्हीआयटी दुर्बिणीने टिपला ऍन्ड्रोमेडा आकाशगंगेतील खगोलीय विस्फोट

नवी दिल्ली – खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या शेजारी असलेल्या ऍन्ड्रोमेडा या आकाशगंगेत पहिल्यांदाच एका ताऱ्याच्या विस्फोटातून बाहेर पडणाऱ्या अतिनील उत्सर्जनाचे अवलोकन केले आहे. ही एक विशेष प्रकारची खगोलीय घटना असून यामध्ये एखादा तेजस्वी तारा अचानक जास्त प्रकाश उत्सर्जित करू लागतो आणि हळूहळू त्याचा प्रकाश मंदावत जाऊन काही आठवडे किंवा महिन्यांनी तो लुप्त होतो. पृथ्वीच्या आकाराचा परंतु अतिशय उष्ण असलेला एक शुभ्र खुजा तारा आणि सूर्यासारखा (किंवा त्याची पुंजात्मक आवृत्ती) दुसरा एक तारा एकमेकांच्या प्रभावक्षेत्रातल्या कक्षांमध्ये अतिशय जवळ फिरत असल्याचे आढळते. अशा प्रकारच्या प्रणालींमध्ये शुभ्र खुज्या ताऱ्यामध्ये असलेल्या तीव्र गुरुत्वीय बलामुळे जोडीदार ताऱ्याचे स्वरुप बिघडू शकते किंवा हे बल या ताऱ्यामधील द्रव्य शुभ्र खुज्या ताऱ्याच्या पृष्ठभागाकडे खेचू शकते. अशा प्रकारे साचलेल्या या द्रव्याचा ढिगारा तयार झाल्याने इतकी तीव्र घनता निर्माण होते की त्यातून एकत्रिकरणाची प्रक्रिया वाढीला लागून त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रकाशाचे उत्सर्जन होते, ज्याला नोव्हा इरप्शन म्हणजेच तारका विस्फोट म्हटले जाते. ताऱ्यांच्या विस्फोटांमुळे आकाशगंगीय रासायनिक समृद्धीत भर पडते. त्यामुळे त्यांचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे.

ही वृद्धी प्रक्रिया शुभ्र खुज्या ताऱ्याभोवती असलेल्या तबकड्यांसारख्या रचनांच्या माध्यमातून सुविहित केली जाते. या तबकड्या अतिशय उष्ण असतात आणि त्या या पट्ट्यातील अतिनील आणि निळ्या भागामध्ये विद्युतचुंबकीय लहरी उत्सर्जित करतात. बंगळूरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स, या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेच्या शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप(UVIT/AstroSat) च्या ऍन्ड्रोमेडा आकाशगंगेच्या पब्लिक अर्काइव्ह्जमधील माहितीचा वापर करून नष्ट होणाऱ्या ताऱ्यांमधून त्यांच्या निष्क्रियतेदरम्यान होणाऱ्या अतितीव्र अतिनील उत्सर्जनाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

हे करत असताना त्यांना खगोलभौतिक अभ्यास पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातील लुप्त होणार असलेल्या ताऱ्यांची माहिती मिळाली. जुधाजित बसू (आयआयए आणि पॉन्डिचेरी विद्यापीठ), कृष्णेंदू एस.(आयआयए आणि अमृता विद्यापीठ), सुधांशून बारवे (आयआयए) आणि जी. सी. अनुपमा यांचा समावेश असलेल्या शास्त्रज्ञांच्या चमूने नोव्हे अर्थात लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या 42 ताऱ्यांमधून झालेल्या अतिनील उत्सर्जनाचा, म्हणजेच विशेष प्रकारच्या खगोलीय विस्फोटांचा शोध लावला आणि अगदी त्यापैकी 4 घटनांमध्ये तर हे तारे आपला विस्फोट घडवून आणत असताना पाहिले गेले. यामुळे शास्त्रज्ञांना अशा प्रकारे आपल्या सर्वात जवळ असलेल्या शेजारी आकाशगंगेतील परस्परांच्या संपर्कात येणाऱ्या दोन ताऱ्यांच्या प्रणालींचा त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजे काही तारे आपल्या जोडीदारांकडून ओढून घेतलेल्या द्रव्याचा ढिगारा रचत असताना तर इतरांकडून ते बाहेर फेकले जात असताना, टप्प्याचा अभ्यास करण्यासाठी यामुळे मदत मिळणार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading