June 14, 2025
Anathachi Mai Poem on Sindhutai Sapkal by Anagha Sawardekar Patil
Home » अनाथांची माय…
कविता

अनाथांची माय…

अनाथांची माय…

वर्धा जिल्ह्यातील नवरगावी
सिंधूताईंचा जन्म झाला
गुरे वळण्याचा वडिलांचा
बालपणी व्यवसाय त्यांनी केला..१

मुलगा घराचा वारस
सर्वांना हवा असे
मुलींचा जन्म होणे
आईबापाला ताप भासे..२

मुलगी असे नकोशी
म्हणून चिंधी नाव ठेवले
गुरे वळायला जाताना सांगून
शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले..३

वयाच्या नवव्या वर्षी
वयस्क पतीशी लग्न झाले
काबाडकष्ट मात्र तिच्या
नशिबास नाही चुकले..४

लहान वयातच तिच्यावर
मातृत्वाचे ओझे पडले
सगळ्यांनी निराधार केले
स्मशानभूमीत राहून पोट भरले..५

वनवासी झाली माय
नाही मानली हार
अनाथांची बनली आई
दिला निराधार मुलांना आधार..६

मिळाले अनेक उच्च पुरस्कार
पद्मश्रीने तिला गौरविले
प्रत्येक अनाथाची आई झाली
ह्रदयात सर्वांच्या अढळ स्थान राहिले..७

कवी ः सौ अनघा सावर्डेकर पाटील
मुंबई


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading