December 28, 2025
‘डीकंपोस्ट’ आणि ‘डिंक पोस्ट’ या एका टिंबाच्या फरकामुळे झालेल्या विनोदी ऑडिट चुका सांगणारी निवृत्ती मथुराबाई जोरी यांची भन्नाट कथा — ‘ऑडिट पॉईंट…!?!?’
Home » ‘ऑडिट पॉईंट…!?!?’
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘ऑडिट पॉईंट…!?!?’

‘डीकंपोस्ट’…. आणि ‘डिंक पोस्ट’ यात फक्त एका टिंबाने सगळं गणित उलट सुलट करून टाकलं….!….

निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी ,
मंडळ कृषी अधिकारी,
लासूर स्टेशन, ता.गंगापूर,
जि.छत्रपती संभाजीनगर
9423180393,8668779597.

शेतातला पालापाचोळा कुजला म्हणजे त्याचं खत होतं हे शास्त्र आपल्याला निसर्गानेच शिकवलं. शेतीला सेंद्रिय खत मिळावं आणि दर्जेदार उत्पादन यावं यासाठी आमच्या शेती खात्याने यामध्ये तंत्रज्ञानाची भर घालत कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेले जैविक खते की जे वापरून लवकरात लवकर शेतातला पालापाचोळा कुजेल आणि त्याचे सेंद्रिय खत पुढच्या पिकांना उपयोगात येईल. या पालापाचोळा कुजवण्याच्या प्रक्रियेला ‘बायोडायनामिक्स कंपोस्ट खत’ अशी संकल्पना खूप जोर धरू लागली. या सर्व प्रक्रियेतला मुख्य तंत्रज्ञानाचा भाग म्हणजे ‘कुजवणे’ त्यालाच इंग्रजीत ‘डीकंपोस्ट’ असं म्हटलं जातं. शेती खात्यात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मुख्य दोन प्रकार त्यातला एक कार्यालयीन कामकाज करणारा ‘कारकून वर्ग’ आणि दुसरा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणारा ‘तांत्रिक वर्ग’. तालुकाभर सर्व शेती प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना करून दाखवण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक साहित्याची ऑर्डर नेहमी तालुका ऑफिसमधूनच दिली जायची. पद्धतशीरपणे कारकूनाने शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसाठी देण्यात येणारे ‘डीकंपोस्टिंग मटेरियलची’ कृषी उद्योग महामंडळाकडे कळवली. त्याप्रमाणे पुरवठाही झाला. आलेलं साहित्य शेतकऱ्यांना वाटप सुद्धा झालं आणि त्याची प्रात्यक्षिके सुद्धा पूर्ण झाली. वर्षभरात नेहमीप्रमाणे कार्यालयाचं ऑडिट करायला वरिष्ठ स्तरावरून नेहमीप्रमाणे ‘ऑडिट पार्टी’ आली ! डीकंपोस्ट मटेरियलच्या खरेदी टिपणीपासून तर त्याच्या पेमेंटचा फायनल चेक बनवेपर्यंत सर्वच ठिकाणी कारकूनाने ‘डिंक पोस्ट’ असं सर्रास लिहिलेलं आढळलं…! ऑडिट पार्टीने शेवटी जाता जाता ऑफिसातल्या कागदाची पाकीटं चिटकवायला आणि पोस्ट करायच्या डिंकासाठी एवढा मोठा निधी कसा लागतो असा ‘ऑडिट पॉईंट’ काढून शासनास अहवाल सादर केला….! ‘डीकंपोस्ट’…. आणि ‘डिंक पोस्ट’ यात फक्त एका टिंबाने सगळं गणित उलट सुलट करून टाकलं….!….


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

विविधांगी अन् समाजाभिमुख काम करणारी शिक्षिका

दुष्टांच्या मनातील दुष्टपणा घालवला तर…

मराठी भाषेचा उत्कर्ष युवा पिढीच्या हाती -प्रा. डॉ. राजा दीक्षित

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading