निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार
मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार २०२४ देण्याचे योजिले आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.
दर वर्षी वेगवेगळ्या साहित्यकृतीना पुरस्कार दिला जातो. यावर्षी कादंबरी, ललितलेख संग्रह, बाल कथासंग्रह/बाल कादंबरी या तीन साहित्य प्रकारात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या दोन वर्षात प्रकाशित झालेल्या प्रत्येकी एक कादंबरी, ललितलेख संग्रह आणि बाल कथासंग्रह/बाल कादंबरीला हा पुरस्कार दिला जाईल.
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे राहील. हा पुरस्कार समारंभपूर्वक ऑक्टोबर २०२४ मध्ये दिले जातील. इच्छुकांनी आपल्या कादंबरी/ ललितलेखसंग्रह / बालकथा संग्रह/बाल कादंबरी ,पुस्तकाच्या प्रत्येकी दोन प्रती, स्वत:चे पासपोर्ट आकारातील छायाचित्र व अल्प परिचय पाठविण्याचे आवाहन निर्मला मठपती फाऊंडेशनच्या अध्यक्षा शिवांजली स्वामी यांनी केले आहे. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ अशी आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता – यु. बी. मठपती, ब्लॉक नं. १४, कनिष्क नगर, जुळे सोलापूर, सोलापूर- ४१३००४. मोबाईल क्र: ९८८१२१६६४८
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.