November 14, 2024
Gulabi Thandi Seema Mangarule Tawtes poem
Home » गुलाबी थंडी
कविता

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

शिशीर ऋतु येतो
गुलाबी थंडी घेऊन
आनंद लूटतात सारे
शेकोटी छान करुन…..

शेतावरती हुरडा काढून
घ्यावा विस्तवावरी भाजून
अंगत पंगत रानामधी
मस्त मजेत घ्यावा खाऊन..

रामाच्या प्रहरी उठून
कडक चहा पिऊन
धुक्याच्या चादरीत
जावे मग विरुन….

शिशिर ऋतूत होते
पानगळ मग सुरू
जुने टाकून धरणी
नव्याने करे आयुष्य सुरु…

सौ सीमा मंगरूळे तवटे, वडूज सातारा


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading