गेल्या काही वर्षांत अनेक चित्रकार पारंपारिक रंग न वापरता अन्य गोष्टींचा वापर करून आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः त्यांना नैसर्गिक रंग वापरावर भर द्यायचा आहे. पर्यावरण पुरक रंगांचा वापर सध्या अनेक कलाकार करताना दिसत आहेत. कॉफीचा वापरही या नैसर्गिक रंगांमधलीच एक म्हणून केला जात आहे.
स्नेहा पेंढारकर
पुरातन काळापासून चहा आणि कॉफीचा वापर चित्रकलेसाठी होत आहे. चीनमध्ये चहाचा वापर चित्र रंगवण्यासाठी बँकग्राऊंड म्हणून केला जायचा. या दोन्ही पेयांचा वापर कापडाला एक विशिष्ट प्रकारची रंग छटा देण्यासाठी होत असे. संगमरवरी पुतळ्यांना प्राचीन रूप देण्यासाठी सुद्धा चहा आणि कॉफीचा वापर होत असे. कॉफीचा चित्रकलेतील वापर हा खूपच प्राचीन असून तो या पेयासोबतच सगळीकडे पसरला गेला.
गेल्या काही वर्षांत अनेक चित्रकार पारंपारिक रंग न वापरता अन्य गोष्टींचा वापर करून आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः त्यांना नैसर्गिक रंग वापरावर भर द्यायचा आहे. पर्यावरण पुरक रंगांचा वापर सध्या अनेक कलाकार करताना दिसत आहेत. कॉफीचा वापरही या नैसर्गिक रंगांमधलीच एक म्हणून केला जात आहे. कारण हिच्या हझेलनटपासुन डार्कब्राऊनपर्यंत असलेली रंगछटे मधली विविधता दिसून येते. हीच कॉफी आर्ट आता थायलंडपासुन अमेरिकेपर्यंत पुर्ण जगात आता प्रसिद्ध झाली आहे.
काॅफी पेंटिंगसाठी लागणारे साहित्य…
- पेंटीग काढण्यासाठी पेन्सिल.
- ब्लॅक पेन, थ्रीडी मार्कर
- इन्स्टंट कॉफी पावडर
- पाणी
- प्लास्टिक कप
- वाॅटर कलर पेपर, स्केच पॅड पेपर किंवा कॅनव्हास शिट
- पेंटब्रश – फ्लॅट ब्रश, पाईंटेड राऊंड टीप ब्रश
कॉफी पेंटीगबद्दल…
कॉफी पेंटीग हे विशेषतः एकाच रंगात असते. हे तयार करण्यासाठी कॉफी पावडर किंवा कॉफीच्या झाडाच्या बियांचा वापर केला जातो. शुद्ध पाण्यामध्ये कॉफी पावडर मिसळली जाते. यापासून तपकिरी ते फिकट पिवळरस रंगाच्या विविध छटा तयार होतात. याचाच वापर करून पेंटिग तयार केले जाते. वार्निश कोटिंगचा वापर करून या पेटिंगला सुंदर केले जाते.
Coffee Painting Seminar by Sneha Pendharkar Coffee Painting Seminar by Sneha Pendharkar
नामवंत आंतरराष्ट्रीय कॉफी पेंटिग कलाकार
- पोर्नचै लेर्थामामसिरी, थायलँड
- हाँग यी, मलेशिया
- अॅन्ड्र्यू सॉर आणि एंजेल सरकेला-सॉर, दोघेही अमेरिका
- स्टीव्हन डी. मायकेल, फ्लोरीडा
- कारेन इलँड, ओक्लाहोमा आणि ओरेगॉन
ह्या जगप्रसिद्ध कलेबद्दल तुम्हाला जाणून आहे का ? तुम्हाला ही कला शिकून आत्मसात करायची आहे का ?
तर मग वाट कसली बघता ? ज्ञानद अकादमी आपल्यासाठी घेऊन येत आहे. ऑनलाईन कॉफी पेंटिंगची कार्यशाळा
अधिक माहितीसाठी संपर्क – 9518924986