September 16, 2024
Gurupurnima the day of self-awareness Pushpa Varkhedkar article
Home » आत्मजागृतीचा दिवस _ गुरुपौर्णिमा
विशेष संपादकीय

आत्मजागृतीचा दिवस _ गुरुपौर्णिमा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
शास्त्रामध्ये गुरुचे महत्व सांगितले आहे तो ब्रह्मा विष्णू महेश व साक्षात परब्रम्ह आहे गुरुची थोरवी फार आहे म्हणून आजचा दिवस आत्मजागृतीचा व कृतज्ञतेचा दिवस आहे.

तमसो मा ज्योतिर्गमय |
असतोमा सद्गमय
मृत्युर्मा अमृतम् गमय|

अंधारातून प्रकाशाकडे, असत्यातून सत्याकडे व मरणातून अमृताकडे नेणारा मार्गदर्शक म्हणजे गुरु.

आज गुरुपौर्णिमा, व्यासपोर्णिमा आषाढ पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यासमुनींनी आपल्या विशाल बुद्धी द्वारा जगाला ज्ञान दिले असा एकही विषय नाही की जो व्यासमुणींना स्पर्श केला नाही.
सहा शास्त्र अठरा पुराण ब्रह्मसूत्र वगैरे
महाभारत रुपी तेल असलेला ज्ञानमय व ज्ञानरूपी दिवा ज्यांनी प्रज्वलित केला अशा विशाल बुद्धी असलेल्या व्यासांना मी प्रथम वंदन करतो.

आपल्या आयुष्याला आकार देण्याकरता अनेकांचे योगदान असते परंतु आपण ज्ञानसंपन्न व वैभव संपन्न झालो की आपण आपल्या वैयक्तिक जीवनात गुर्फटून जातो व आपण आपल्या यशस्वीतेचं गमक काय आहे? याचा आपल्याला विसर पडतो.

अगदी लहानपणी चालायला बोलायला शिकवणारे आपले माता-पिता आपले आद्य गुरु आहेत. नंतर ज्ञानदान करणारे आपले शिक्षक आहेत.

समाजातील काही घटक चारित्र्यवान शीलवान मित्र, आप्त वर्ग हे देखील आपले जीवन सर्वांग सुंदर करण्यास सहाय्यक ठरतात. त्या सर्वांचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.

क्षणभर आजच्या दिवशी आपलं जीवन ज्ञानसंपन्न, वैभव संपन्न यश किर्ती मिळण्यामागे असणाऱ्या व्यक्तींचा स्मरण करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. धर्म, अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत त्यापैकी आपण जन्माला आल्यानंतर आपला धर्म कोणता. जीवनचरित्रार्थ घालण्याकरिता अर्थप्राप्ती करणे प्रज्योत्पादनासाठी काम व आपल्या आत्म्याचा उद्धार करण्याकरिता मोक्षाची प्राप्ती म्हणून अध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घेण्याकरता आपल्याला सद्गुरूची आवश्यकता आहे. अशा ब्रह्मज्ञानी संताचा सत्कार करून त्यांच्याकडून आपण ईश्वरी तत्त्व जाणून घ्यावे मी कोणी नाही अशी वृत्ती होते तेव्हाच ज्ञानाची प्राप्ती होते.

म्हणून केवळ सद्गुरू कृपेने बोलले जाते किंवा सांगितले जाते या म्हणण्याचे सगळे श्रेय सद्गुरूंना दिल्यामुळे माझे मन बोलण्या करिता निःशंक झाले आहे असे ज्ञानदेव म्हणतात. इतके महत्त्व त्यांनी सद्गुरु चे सांगितले आहे गुरु तेथज्ञान. ज्ञानी आत्मदर्षण दर्शनी समाधानच आथी जैसे एखाद्या दीपस्तंभ प्रमाणे गुरु काम करतात. गुरु म्हणजे मांगल्याचे प्रतीक आहे. अमंगलाचा नाश करणारा आहे परंतु तो गुरु कसा असावा?

दिव्यत्वाची जेथ प्रचिती.
तेथ कर माझे जुळती
असे कवी श्री बा. भ. बोरकर म्हणतात. दिव्यत्व म्हणजे काय?

कोणत्याही क्षेत्रात असाधारण कार्य ज्याच्या हातून घडते त्या व्यक्ती पूजनीय असतात.
दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं होऊ नये. अंधश्रद्धा, अंधविश्वासाला बळी पडून कोणत्याही व्यक्तीच्या मागे लागू नये.

वंदनीय सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, मदर टेरेसा यांच्या कार्याचा मागोवा घेऊन आपण आपल्या जीवनात कार्य करणे म्हणजे आपण त्यांना आपले गुरु मानले. पायाचे तीर्थ घेणे, हार फुले वाहने पूजा करणे म्हणजे गुरुपूजन नाही. ते वंदनीय असले पाहिजे भगवद्गीता प्राकृत भाषेत करणारे संत श्री ज्ञानेश्वर महाराज सर्वाभूती परमेश्वराची अनुभूती असणारे संत एकनाथ महाराज अद्भुत असा अभंग गाथा रचणारे संत तुकाराम महाराज, गाडगेबाबा यांनी समाजाकरीता योगदान दिले त्याग केला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सावरकर इत्यादींनी देशाकरिता महान त्याग केला. ते गुरूच्या स्थानी आहेत. या भुतलावर समाज सुधारक संत हेच चालते बोलते परमेश्वर आहेत.जो सर्वगुणसंपन्न आहे. वेदशास्त्र निपुण आहे अशी व्यक्ती पूजनीय मानावी.

गळ्यात माळा भगवी वस्त्रे अंगारा अंगारा भस्म लावले व मोठी मोठी शास्त्र वचने सांगितली म्हणजे ते पूजनीय ठरत नाही तर त्याच्या आचरणातून ते जगाला सत्पथावर नेणारे मार्ग दर्शक ठरावे.

आदिशक्ती मुक्ताई आपल्या अभंगातून खऱ्या गुरुची साधूची ओळख सांगते.

वरी वरी- भगवा झाला नामे|
अंतरी वश केला कामे|
तया म्हणू नये साधू|
जगी विटंबना बाधू|
केवळ केवळ वेशभूषा धारण करून मनामध्ये कामवासणा ठेवली तर तो साधू होणार नाही..
संत गाडगेबाबाचा वेश पाहता

वरी पिशाच्च अंतरी शहाणा
सदा ब्रम्ही जाणा निमग्न तो
जो निरिच्छ सत्वगुणी ब्रह्मज्ञानी आहे.
व ज्याचे आचरण सर्वत: धर्माधिष्ठित आहे. ते सद्गुरु या पदाला प्राप्त होतात व त्यांनाच आपले गुरु मानावे त्यांना गुणाच्या कसोटीवर पारखून घ्या व मग त्यांना वंदनीय ठरवा.

आपल्याला जर पटत नसेल तर ग्रंथ हे गुरु आहेत त्यांचा स्वाध्याय अध्ययन मनन चिंतन एकांतात बसुन वाढवावे ते सुध्दा सद्गुरू आहेत व त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा.

मानवाच्या शाश्वत कल्याणासाठी गुरुची नितांत गरज आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात.

म्हणोनी जाण तेने गुरू भजिजे|
तेने कृतकार्य होइजे|
मूळ सिंचने सहज|
शाखा पल्लव संतोषती!
जाणकार साधकाने गुरुने सांगितलेल्या मार्गावर जर आत्मबोधप्राप्तीसाठी प्रयत्न केल्यास इहलौकिक व पारलौकिक जीवन धन्य होईल व दुःखाची निवृत्ती व मुक्तीचा मार्ग मोकळा होईल. शिष्य देखील त्या पात्रतेचा असावा गुरुवर त्याची श्रद्धा हवी नम्रता गुणग्राहकता एकनिष्ठता भक्ती हे गुण त्याची अंगी असावे.

गुरुला साष्टांग प्रणिपात करून प्रश्न विचारावे व ते तुला उपदेश करतील आत्मसाक्षात्कार होण्याकरिता अशी नम्रता समर्पण जिज्ञासा असावी आणि गुरूच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे चिंतामणी हातात आला तर सर्व हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे श्री गुरूच्या कृपेने सर्व हेतू तडीत जातात

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
शास्त्रामध्ये गुरुचे महत्व सांगितले आहे तो ब्रह्मा विष्णू महेश व साक्षात परब्रम्ह आहे गुरुची थोरवी फार आहे म्हणून आजचा दिवस आत्मजागृतीचा व कृतज्ञतेचा दिवस आहे.
पुनश्च गुरुला वंदन करून तुमच्या व माझ्या जीवनाला आकार देणारे ज्ञान प्रदान करणारे सर्व गुरुजनांना मी वंदन करते प्रणिपात साष्टांग नमस्कार करते.

सौ पुष्पा सुनील वरखेडकर
माजी पर्यवेक्षिका पीडी कन्या शाळा, वरुड


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मनुष्य अन् त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील बंधांचा शोध घेणारा चित्रपट सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स)

Video : कडीपत्ता झाडाची निगा…

साक्षात शिष्याजवळ येते ब्रह्मज्ञान विश्रांतीला

1 comment

डॉ.योगेशसिंह ब बायस July 21, 2024 at 7:50 PM

छान लेखन.वंदनीय गुरूंच्या उदाहरणासह लेखन प्रपंच केलेले आहे परंतु पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख होणे अपेक्षित होते हे माझे वयक्तिक मत आहे बाकी सर्व लेखन अप्रतिम आहे धन्यवाद

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading