April 19, 2024
Pimpri Chinchwad Maharashtra Sahitya Parishad awards
Home » पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

पिंपरी चिचवड येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विविध विभागातील साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. कादंबरी विभागात डॉ. स्मिता दातार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

कादंबरी, ललित, कथा कविता आणि बालसाहित्य या पाच साहित्य विभागातील पुस्तकांमधून परीक्षकांनी दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक विभागातील उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार व लक्षवेधी वाङ्मय पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडतर्फे जाहीर करण्यात आले. पुरस्कार वितरण पुरस्काराचा समारंभ शुक्रवारी, २८ एप्रिल रोजी होणार असून, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रसिद्ध निवेदक लेखक सुधीर गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी दिली.

विविध साहित्य विभागातील पुरस्कार असे –

कादंबरी विभाग :

पांडुरंग जोशी स्मृती उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार व नाना दामले स्मृती लक्षवेधी वाङ्मय पुरस्कार डॉ. स्मिता दातार (मुंबई) यांच्या ‘फक्त तिच्यासाठी’, तर शीतल देशमुख डहाके (यवतमाळ) यांच्या व्हेन माय फादर या कादंबरीची अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्मय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

ललित विभागः

रवींद्र पाटील पुरस्कृत ललित वाङ्मय पुरस्कार, धनश्री लेले (ठाणे) यांच्या अलगद, तर नंदकुमार मुरडे (पुणे) यांच्या दस्तऐवज शब्दांचा या पुस्तकांची अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्मय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

कथा विभाग :

अशोक इनामदार स्मृती वाङ्मय पुरस्कार, दत्तात्रय सैतवडेकर (मुंबई) यांच्या ब्रेकिंग न्यूज, तर रमेश पिंजरकर (पुणे) यांच्या अरण्यरुदन या कथासंग्रहांची अनुक्रमे उत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाली.

कविता विभाग:

अपर्णा मोहिले स्मृती वाङ्मय पुरस्कार, शशिकांत हिंगोणेकर (जळगाव) यांच्या युद्धरत, तर विलास गावडे (पनवेल) यांच्या देशाचं महानिर्वाण या काव्यसंग्रहांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

बालसाहित्य विभागः

दि. बा. कुलकर्णी स्मृती उत्कृष्ट वाङ्मय व संभाजी बारणे पुरस्कृत लक्षवेधी वाङ्मय पुरस्कार, विनोद पंचभाई (पुणे) यांच्या हे खरे जगज्जेते या चरित्रात्मक पुस्तकाची व मुरहारी कराड (लातूर) यांच्या नव्या जगाची मुले या काव्यसंग्रहांची विभागून, तर रमेश वंसकर (गोवा) यांच्या आइस्क्रीमचं तळं या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे.

यावेळी जीवन साधना पुरस्कार शिक्षणतज्ज्ञ, लेखक डॉ. न. म. जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती लाखे यांनी दिली.

Related posts

अवकाळीचे वातावरण अजूनही टिकूनच

बटाटा लागवडीचे सुधारित तंत्र

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

Leave a Comment