ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये शेवगा या वनस्पतीबद्दल माहिती…
– सतिश कानवडे
संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804
वनस्पतीचे नाव- शेवगा
वनस्पतीचे वर्णन–
मोरीगोसी प्रकारातील वनस्पती. फळे ही लांबट शेंगा प्रकारातील असतात. त्यात बिया असतात. त्याच्या तिन्ही बाजूला पंखासारखे पापुद्रे असतात.
औषधी उपयोग–
शेवग्याची शेंग ही स्वादिष्ट आहे. कफ, पित्तनाशक आणि शुत्न कुस्थ क्षय, गुल्मनाशक आहे. त्यात दोन प्रकारचे पांढरे अल्कलाइडस असतात. तसेच रेझिन्स व म्युसिलेज ही बऱ्याच प्रमाणात असते. बियामध्ये बेनी/मोरिंगा तेल असते. शेवग्याचा पाने, फुले, शेंगा, मुळे याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. यामध्ये अ आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहे. कॅल्शियम सुद्धा असते. पानाचा उपयोग दृष्टी सुधारण्यासाठी होतो. मुळांच्या सालीपासून पावडर तयार केली जाते. या पावडरचा उपयोग ताप, मूर्च्छा येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, मुळव्याध, दमा, भूक न लागणे यावर केला जातो. शेवग्याचा डिंक तिळाच्या तेलात घालून कानात घातल्यास कान दुखणे थांबते.
हवामान व जमीन–
उष्ण व समशीतोष्ण ६५ ते ८० टक्के आद्रता असणारे हवामान शेवग्याच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. शेवग्यास हलकी ते मध्यम जमीन मानवते.
लागवड–
शेवग्याची लागवड ५ बाय ५ मीटर अंतरावर करावी. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे.
Join Us : फेसबुक पेज लाईक करा - इये मराठीचिये नगरी । Follow Twitter - इये मराठीचिये नगरी ।
काढणी–
साधारणपणे फेब्रुवारीपासून शेंगा काढणीस सुरवात होते.
आंतरपीक–
शेवग्याच्या झाडांमध्ये भाजीपाल्याची आंतरपिके घेता येतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
अशी माहीत लोकांपर्यत पोहचली पाहीजे छान माहिती आहे