कधीच कवितेचा शेवट होत नाही
ती वेगवेगळ्या विषयांवर
संभाषण करीत असते…
कधी नजरेला नजर मिळवून
रंगभूमीवर सामाजिक विचारांचे
प्रबोधन करत मानवी धैर्याने बळ देते….
सदैव उसळत असलेल्या
समुद्राच्या त्या लाटा किनाऱ्यावर
उमटलेल्या पावलाना कुशीत घेते…
आसंवाना लपवून तरंगत्या जहाजाला
पोहण्याची ती वलय क्षणाची हौस ती
नकळतपणे पैलतीरावर नेथे….
विरहीत बहरलेल्या मीपणात
शृंगारलेल्या हिरवळ निसर्गाची प्रशंसा
करत वेगळा अनुभव देऊ लागते…
रहस्यमय कथेत ती उमलत जाणारी
काव्ये सत्यात परिवर्तन लढा देत
संघर्ष चळवळीत अखंडीत जन्मते…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.