दृकश्राव्य दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्यातील क्रांती आहे. साहित्य क्षेत्रात अशा नवनवीन कल्पना उदयास याव्यात, असे मत ज्येष्ठ रंगमंच व चित्रपट अभिनेते श्रीराम पेंडसे यांनी व्यक्त केले.
रेणुका आर्टस् निर्मित आसावरी इंगळे संपादीत स्पर्श दृकश्राव्य दीपावली अंक, २०२३ चे गुगल मीटवर श्रीराम पेंडसे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन झाले. या आभासी प्रकाशन सोहळ्यास या अंकाचे लेखक, कवी, कलाकार आणि इतर मान्यवर यांची लक्षणीय उपस्थिती होती.
रेणुका आर्टस् निर्मित स्पर्श दृक्श्राव्य (Audio Visual) दिवाळी अंकाचे हे चौथे वर्ष आहे. साहित्य व कलेचा सुरेख संगम असलेला हा डिजिटल अंक इतर अंकांपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. आसावरी इंगळे संपादित या अंकात देशविदेशातून सहभागी झालेल्या साहित्यिकांच्या त्यांनीच लिहिलेल्या व सादर केलेल्या कथा, कविता, लेख तर आहेच याशिवाय हौशी कलाकारांचे गायन व हस्तकला देखील आहेत. याव्यतिरिक्त किलबिल विभागात बालकलाकारांनी सादर केलेल्या कला देखील आहेत. वाचक व रसिकांसाठी बुकगंगावर उपलब्ध असलेला हा नाविण्यपूर्ण अंक पूर्णतः निःशुल्क आहे. हा अंक पेपरलेस असल्याने पर्यावरणपूरक आहे. आपल्या वेळेच्या सोयीनुसार कधीही, कुठेही, केव्हाही आस्वाद घेता येणारा हा एकमेव अंक आहे.
स्पर्श दृक्श्राव्य (ऑडियो विझ्युअल) दिवाळी अंक फ्लिपबुक आणि पीडीएफ या दोन स्वरुपात तयार करण्यात आला आहे. सध्याच्या संगणक युगाशी ‘मॅच’ करण्यासाठी या अंकात QR कोडचा देखील वापर करण्यात आलाय.
कसा आहे दृकश्राव्य दिवाळी अंक पाहण्यासाठी फ्लिपबुक लिंकवर क्लिक करा…
फ्लिपबुक लिंक –
https://heyzine.com/flip-book/368c2a738c.html
पीडिएफ लिंक –
https://acrobat.adobe.com/link/review?uri=urn:aaid:scds:US:378a8b2c-426e-335c-911b-3903b064c5ba
प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि शारदा स्तवन शुची बोरकर यांनी केलं. तर शिल्पा टोपे यांनी सुत्रसंचालन केले. जयश्री देशकुलकर्णी आणि रेखा तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. कोकिळा ढाके यांनी आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.