September 16, 2024
Farmers Monthly average income per agricultural household
Home » सरकारच्या मते इतके आहे शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सरकारच्या मते इतके आहे शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न

नवी दिल्ली – राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे जानेवारी 2019-डिसेंबर 2019 या काळामध्‍ये  देशाच्या ग्रामीण भागातील कृषी कुटुंबांच्या परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षणाच्या (एसएएस) 77 व्या फेरीनुसार कृषी वर्ष जुलै 2018- जून 2019, राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार प्रति कृषी कुटुंबाच्या सरासरी मासिक उत्पन्नाचा तपशील असा आहे.

जुलै 2018 जून 2019 या कृषी वर्षात राज्‍यनिहाय /केंद्रशासित प्रदेशानुसार सरासरी मासिक उत्पन्न प्रति कृषी कुटुंब (केवळ देय खर्च लक्षात घेऊन)

tate/ Group of UTsAverage monthly income  per agricultural household(₹)
Andhra Pradesh10,480
Arunachal Pradesh19,225
Assam10,675
Bihar7,542
Chhattisgarh9,677
Gujarat12,631
Haryana22,841
Himachal Pradesh12,153
Jammu & Kashmir18,918
Jharkhand4,895
Karnataka13,441
Kerala17,915
Madhya Pradesh8,339
Maharashtra11,492
Manipur11,227
Meghalaya29,348
Mizoram17,964
Nagaland9,877
Odisha5,112
Punjab26,701
Rajasthan12,520
Sikkim12,447
Tamil Nadu11,924
Telangana9,403
Tripura9,918
Uttarakhand13,552
Uttar Pradesh8,061
West Bengal6,762
Group of N E States16,863
Group of UTs18,511
All India10,218

या मिळकतीमध्ये मजुरीचे उत्पन्न, जमीन भाडेपट्ट्याने मिळणारे उत्पन्न, पीक उत्पादनातून मिळणारे निव्वळ उत्पन्न, जनावरे पालनातून मिळणारे  उत्पन्न  आणि बिगरशेती व्यवसायातून मिळणारे निव्वळ उत्पन्न  यांचा समावेश करण्‍यात आला आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न किती असायला हवे यावर शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांचे मत…

सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही असे दिसते. खूपच तुटपूंजे आणि अत्यल्प उत्पन्न आहे. प्रति महिना सुमारे २५ हजार रुपये उत्पन्न शेतकऱ्याचे असायला हवे. इतके उत्पन्न शेतकऱ्याला मिळण्यासाठी सरकारने हमी भावाचा कायदा करायला हवा. तसेच शेतकऱ्याच्या डोक्यावर आत्ता जे कर्ज आहे. त्या कर्जावर मार्ग काढण्याची गरज आहे. या कर्जातील काही रक्कम माफ करावी. व्याजमाफी द्यावी. काही वर्षांची मुद्दल गोठवण्याचीही गरज आहे. त्याचे रुपांतर वेगळ्या कर्जात करून दहा वर्षांच्या मुदतीत ही कर्जाची रक्कम फेडण्याची संधी द्यावी. शेती आणि शेतकरी जगण्यासाठी हे सर्व करण्याची गरज आहे. याचा सरकारने गांभिर्याने विचार करावा.

राजु शेट्टी, माजी खासदार, शेतकरी संघटना

शेती बाह्य उत्पन्न वगळून होणारे उत्पन्न सांगायला हवे होते. ज्यांना शेतीबाह्य उत्पन्न आहे त्यांना तुम्ही शेतकरी कसे समजता ? किसान सन्मान योजनेतून आत्ताच एक कोटी 88 लाख खातेदार वगळले आहेत. त्यांचे उत्पन्नही शेतकऱ्यांचे उत्पन्न म्हणून या आकड्यात धरले असण्याची शक्यता आहे. नोकरदार, व्यावसायिक, कारखानदार, राजकिय नेते यांचे शेती बाह्य उत्पन्न धरून हा आकडा फुगवल्यासारखे वाटते. ही आकडेवारी भ्रामक आहे. ज्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती आहे, त्यांची खूप वाईट परिस्थिती आहे.

अमर हबीब, किसानपूत्र संघटना

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

चंद्राची आरती…

महिलेला न्याय देण्यासाठी पाथ फाऊंडेशनची धडपड…

धनेश मित्र !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading