मराठी भाषेची गंमत…
मायंदाळ म्हणजे काय ? बक्कळ,
बक्कळ म्हणजे काय ? पुष्कळ,
पुष्कळ म्हणजे काय ? लय,
लय म्हंजी काय? भरघोस,
भरघोस म्हणजे काय ? जास्त,
जास्त म्हणजे काय ? भरपूर,
भरपूर म्हणजे काय ? खूप,
खूप म्हणजे काय ? मुबलक,
मुबलक म्हणजे काय ? विपुल,
विपुल म्हणजे काय ? चिक्कार,
चिक्कार म्हणजे काय, मोक्कार,
मोक्कार म्हणजे काय ? मोप,
मोप म्हणजे काय ? रग्गड,
रग्गड म्हणजे काय ? प्रचंड,
प्रचंड म्हणजे काय ? कायच्या काय,
कायच्या काय म्हणजे काय ? लय काय काय….
आत्ता कळलं का की इंग्रजीत सांगू…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.