साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांची नवी कादंबरी
काळ्यामाळ्या भिंगोळ्या पुस्तक सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/3ROafbF
शिक्षणाच्या बाजारात फोफाट माजलेल्या आर्थिक, नैतिक आणि बौद्धिक भ्रष्टाचाराच्या वर्तमान वास्तवाचा त्रिमितिक एक्सरे या काळ्यामाळ्या भिंगोळ्या कादंबरीत आहे. तसेच आधुनिक मराठी साहित्याच्या देशीवादी गद्य परंपरेतील महत्त्वाचा नवा आविष्कार आहे. कादंबरीकाराच्या सामाजिक सभानतेशी एकरूप कथन- नीतिमत्ता कशी असावी याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. ग्रामीण महाराष्ट्रात समाजाच्या सर्वच स्तरावर खोल आत घुसलेली कीड, किडनी विकून जगणाऱ्या शालेय शिक्षकाच्या आणि आत्महत्यांच्या कड्याकडे ढकलल्या गेलेल्या, कोंडीत सापडलेल्याच्या नजरेतून क्षण-दर-क्षण टिपणारा ‘समक्ष’ अनुभव वृत्तांत या कादंबरीत आहे. ‘आपण दगडं फोडलेली बरी. इथं माणसाला माणूस म्हणून काहीच कसं ऐकायला येत नाही? आपल्या या व्यवस्थेनं मातीच्या गोळ्यांचं दगड तर घडवलं नाहीत?’, विचारत, व्यवस्थेचा दगड फोडून दाखवणारी ही कादंबरी आहे. भारतीय साहित्यात क्लासिक मानल्या गेलेल्या श्रीलाल शुक्लांच्या ‘राग दरबारी’च्या कसाची, दमदार राजकीय-वृत्तांत कादंबरी आहे.
गणेश देवी
पुस्तकाचे नाव – काळ्यामाळ्या भिंगोळ्या
लेखक – कृष्णात खोत
प्रकाशक – पाॅप्युलर प्रकाशन
पृष्ठे – ४६२ । मूल्य – ६९५/-
काळ्यामाळ्या भिंगोळ्या पुस्तक सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/3ROafbF
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.