नंदकिशोर भोळे, प्रमोद कोयंडे, डॉ सिसिलाया कार्व्हालो, संयुक्त कुलकर्णी यांच्या साहित्यकृतीस आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे पुरस्कार
आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे देण्यात येणारे कादंबरी, गद्यसाहित्य, कथासंग्रह आणि बाल साहित्याचे पुरस्कार जाहीर झाले आहेत, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष डॉ अशोक बाचुळकर यांनी दिली आहे. यावेळी उपाध्यक्षा गीता पोतदार, कार्यवाह सदाशिव मोरे व विजय राजोपाध्ये हे उपस्थित होते.
2019 या वर्षी प्रथम प्रकाशित झालेल्या साहित्यास हे पुरस्कार देण्यात आले आहेत. ग्रंथालयाकडे पुरस्काकरिता प्राप्त पुस्तकातून ही निवड करण्यात आली आहे.
मृत्यूंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार नंदकिशोर भोळे मुंबई यांच्या अनुबंध या कादंबरीस देण्यात आला आहे. कै दाजी टोपले कथासंग्रह पुरस्कार प्रमोद यशवंत कोयंडे कणकवली यांच्या सोबतीण या पुस्तकास देण्यात आला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्यसाहित्यकृती पुरस्कार डॉ सिसिलाया कार्व्हालो यांच्या टिपवणी याच्या पुस्तकार देण्यात आला आहे. तर बाल साहित्य पुरस्कार संयुक्ता हेमंत कुलकर्णी मुंबई यांच्या एकांकिका धमाल या पुस्तकास देण्यात आला आहे.
प्रा. वासुदेव मायदेव, डॉ आनंद बल्लाळ, संपत देसाई, प्रा. सुभाष कोरे, डॉ मारुती डेळेकर, पी. बी. पाटील, सुभाष विभुते, डॉ. बाचुळकर, रमेश भोसले, सुरेखा भालेराव, शुभांगी निर्मळे व तनुजाराणी घाटगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले.