शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राच्या वतीने कोल्हापूर येथील सकल धनगर समाज आणि कुपवाड येथील श्री हालमत सांप्रदाय मंडळा यांच्यावतीने कसबा बावडा येथे “हालमत संस्कृती संवर्धन शिबीर” आयोजित केले होते. या शिबिरात लोककलांचे सादरीकरणं करण्यात आले. यामध्ये माणदेश, कोल्हापूर, सांगली, कोकण, कर्नाटक अशा वेगवेगळ्या भागातील पथकांनी सहभाग घेतला. शाहीर, कन्नड आणि मराठी भाषिक ओव्या, वेगवेगळ्या प्रकारची हेडामनृत्यं, गुंड खेळणे, तलवारीने हेडामं खेळणे, रूमसुरी खेळणे, भाकणूक, वीर काढणे, परडी, जक्यार, घुगळ, खडी, महिलांची दुधाची गाणी, कोष्ट्याची नार, वालूग, अशा अनेक प्रथा, परंपरा आणि लोककला सादर करण्यात आल्या.
हालमत संस्कृती संवर्धन शिबिरात सादर करण्यात आलेल्या विविध लोककला पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा…