July 27, 2024
vekhand-medicinal-plant Acorus Calamus
Home » वेखंड (ओळख औषधी वनस्पतीची)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वेखंड (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये वेखंड या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804

वनस्पतीचे नाव – वेखंड

वनस्पतीचे वर्णन –

ऑरसी कुळातील झुडुपवर्गीय वनस्पती आहे. दलदलीच्या ठिकाणी नदी किनारी आशिया, युरोप, रशियामध्ये याची नैसर्गिकरित्या वाढ होते. भारतात याची व्यापारीदृष्ट्या लागवड कर्नाटकातील काही जिल्ह्यात केली जाते. खोड जमिनीत पसरते. त्यास कंद म्हणतात. पाने गवतासारखी अगर तलवारीच्या पात्यासारखी असतात. त्याला पोय येते. हिरवट रंगाची फुले आणि फळे पिरॅमिड सारखी असतात.

औषधी उपयोग

वेखंडमध्ये सुगंधी द्रव्ये असतात. खोड व पंचांग पावडर हे पाचक, उत्तेजक व जंतुनाशक आहे. वेखंड हे उष्ण, सुगंधी, कडू, उत्तेजक, वायुनाशी, स्वेदजनक, तिखट, वांतीकारक, मुत्रविशोक असून कफ, वायू, ज्वर, अतिसार आदीचा यांचा नाश करते. याच्या वाळलेल्या कंदामध्ये २ ते ३ टक्के सुगंधी तेल, ग्लुकोसाईड, युजीनोल, केपिंग एकोरीना आदी सुगंधीद्रव्ये आहेत. कफ पाडण्यासाठी ही वापरतात. ताप उतरवण्यात ही मदत होते. संधिवात, अर्धांगवायू यावर वेखंडाचा लेप वापरतात. हे एक उत्तम कीटकनाशक आहे. कपड्याला कसर लागू नये म्हणून भारी कपड्यात घालून ठेवतात. वेखंड+पिंपळी+केशर एकत्र करूनही देतात. वनस्पतीमुळे विशार झाल्यास अफू, बचनाग, धोतरा, तर वेखंड पूड पाण्यातून देतात. हा उत्तम उतारा आहे. बिळातून साप काढण्यासाठी वेखंड पूड बिळात टाकतात. साप धरण्याकरता हाताला वेखंड पूड लावतात.

हवामान व जमीन

वेखंडाची लागवड ही बरीचशी भाताच्या लागवडीसारखी आहे. त्यामुळे भात पिक ज्या हवामानात घेतले जाते तेथेच वेखंडाची लागवड केली जाते. जास्त पाऊस असणाऱ्या ठिकाणी याचे पिक चांगले येते.

लागवड

आधीच्या पिकांचे शेंडे वापरून लागवड केली जाते. लागवडीसाठी ३० बाय ३० मीटर अंतराची शिफारस केली आहे. गड्डे(जेठे) लावून हळद अगर आल्यासारखी याची लागवड करावी.

खते

१० ते १२ टन हिरवळीचे खत १५ टन कंपोस्ट प्रतिहेक्टरी घालावे. १०० किलो अमोनियम सल्फेट, ३०० किलो सुपर फोस्फेट व १०० किलो म्युरेट ऑफ पोटेश प्रती हेक्टरी द्यावे.

काढणी

लागवडीनंतर वर्षभरात पिक काढणीस तयार होते. शेतातील पाणी काढून शेत कोरडे करावे. त्यावेळी झाडाची पाने जून होवून पिवळट पडू लागतात. मुले ६० सेमी खोलीवर ३० ते ६० सेमी लांबीची असतात. हे लक्षात घेवून मुले खोदावी. अशा मुलाचे ५ ते ७.५ सेमी लांबीचे तुकडे करून स्वच्छ धुवून उन्हात वाळवावी. ते तुकडे पोत्यात भरून ते चोळावे. मुळ्या वाळण्यापूर्वी साली काढू नयेत.

उत्पन्न

प्रती हेक्टरी १० टन उत्पन्न मिळते. ३ ते ३.५ टक्के सुगंधी तेल मिळते. ओल्या वेखंडास ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. वेखंड तेल हे ७०० ते ७५० रुपये किलो विक्री होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गाईच्या शेणापासून उत्पादित विषाणूरोधी घटक रोखते वस्त्रावर विषाणूंची वाढ

Video : अंदमानमधील समुद्री जीवसृष्टी…

निसर्ग !…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading