साधारण 1972-73 चा काळ, शालेय जीवनाचा मंतरलेला काळ आणि याच काळात चित्रपटांचे आपसूकच खूप आकर्षण वाटायचे. त्या वेळी स्क्रीन नावाचे साप्ताहिक दर रविवारी प्रकाशित व्हायचे तसेच तेंव्हा ऑफसेट प्रिंटिंगचे तंत्र विकसित झाले नव्हते. स्क्रीन साप्ताहिकमध्ये चित्रपटातील नट – नट्या यांची रेखाचित्रे प्रकाशित व्हायची, त्या काळी हेच एक आकर्षण असायचे. मला ही रेखाचित्रे खूप आवडायची. राजेश खन्नाचा तो काळ होता. मीनाकुमारीच्या निधनानंतर तिचं पानभर रेखाचित्र प्रसिद्ध झाले होते ते चित्र मला खूप आवडले होते. नंतर नवनवीन चित्रपटातली विविध नट नट्यांची रेखाचित्रे माझे मन ओढून घ्यायचे. माझी चित्रकलेकडे झुकल्याची ती नांदी होती. काळ पुढे गेला आणि शेवटी चित्रकारच झालो. संसार – नोकरी, जगणं धडपडणं, संघर्ष या सगळ्या उहापोहात मनाजोगे, आवडीचे काम करण्याची संधी खूप कमी वेळा आली आणि त्यात मोठा काळ निघून गेला. अलीकडेच निवृत झालो आणि राहिलेली उर्मी पुन्हा उफाळून आली आणि त्याचा परिपाक म्हणून झपाटल्यासारखी व्यक्तीचित्रे करू लागलो. त्यात या फिल्मी नायिकांची अनेक रेखाचित्रे केली. मागच्या वर्षीचा लॉकडाऊन खऱ्या अर्थाने चांगल्या गोष्टींसाठी सार्थक झाला. यातील काही रेखाचित्रे…
प्रदीप घोडके
मोबाईल – 9850734597
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.