March 29, 2024
Home » अभिनेत्री माधुरी पवारने केली अजिंक्यतारा गडाची स्वच्छता
फोटो फिचर

अभिनेत्री माधुरी पवारने केली अजिंक्यतारा गडाची स्वच्छता

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिनेत्री माधुरी पवार हिने अजिंक्यतारा गडावर स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी वीरपत्नी तसेच सैनिक बांधवांचा सन्मान सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. अभिनय, नृत्य अदाकारी बरोबरच माधुरी नेहमीच तिच्या वेगळेपणाबद्दल नेहमीच चर्चेत असते. भारतीयत्वाबद्दल नेहमीच तिला अभियान वाटतो. आम्ही सगळे भारतीय आहोत आपल्या भाषा वेगळ्या, प्रांत वेगळे असले तरी आपण नेहमीच या सर्वाचा आदर करायला हवा. राष्ट्रीय एकात्मता जोपासायला हवी असे माधुरीला नेहमीच वाटते. यातूनच तिला कन्नड भाषा येत नसूनही तिने एका कन्नड चित्रपटात काम केले आहे. भारतातील इतर भाषाही आपणास यायला हव्यात. ती संस्कृतीही आपण अभ्यासायला हवी असे मनोमन माधुरीला वाटते. तसा तिचा प्रयत्नही असतो.

आपण सातारकर आहोत याचा माधुरीला अभिमान आहे. साताऱ्याच्या मानातील तुरा असणारा अजिंक्यतारा नेहमीच तिला खूणावत असतो. गडाचा इतिहास त्याची वैशिष्ट्य आणि त्याचे संवर्धन व्हावे या उद्देशाने माधुरीने शिवजयंतीच्या निमित्ताने स्वच्छता मोहिम राबवली. त्यात सहभाग घेत हातात झाडू घेत तिने स्वतः गडाची स्वच्छता केली. या कार्यात तिला सहकार्य करणाऱ्यांचे तिने आभारही मानले. यावर बोलताना माधुरी म्हणाली, किल्ले अजिंक्यतारा वरील स्वच्छता मोहिमेत आणि वीरपत्नी तसेच सैनिक बांधव यांचा सन्मान सोहळ्यात आपण मला दिलेली साथ खूप अनमोल आहे. तुम्हा सगळ्यांशिवाय हे कार्य सफल होऊ शकलचं नसतं. आपलं छत्रपती शिवाजी महाराजांवरच प्रेम आणि मला दिलेली साथ यामुळेच मी माझ्या आयुष्यातील पहिली मोहीम फत्ते करू शकले. यापुढें सुद्धा मला माझ्या प्रत्येक कार्यात तुमची हक्काची साथ मिळणारच हा विश्वास मनाशी बाळगून तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते.

सध्या माधुरीला महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. माधुरी उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. माधुरीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्येही माधुरीने काम केले आहे.

महेश मांजरेकर यांचा एवढा मोठा प्रोजेक्ट मिळाल्यावर माधुरी म्हणाली, ‘मी खूपच खूश आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी या संधीचे नक्कीच सोने करेन. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात मी संवेदनशील भूमिका साकारली आहे. ती भूमिका आव्हानात्मक होती. महेशसरांकडून शाबासकीही मिळाली. तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि आणखी चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Related posts

समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता

“… हा तर माणगाव परिषदेचा सन्मान!!!”

तरुणाईच्या भावनेतून साकारलेला कोरोना काळातील दस्तऐवज

Leave a Comment