शिलाहार शिल्पकलेचा नमुना असलेले कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर या गावी कृष्णेच्या तिरावर उभारण्यात आले आहे. मदिरात प्रवेश केल्यानंतर स्वर्ग मंडप पाहायला मिळतो. ४८ खांबावर उभारलेला मंडपामध्ये मध्यभागी वरच्या बाजूस १३ फुट व्यासाची गोलाकार मोकळी जागा आहे. त्यातून आकाशाचे दर्शन होते. या मंडपात होम हवन केले जात होते. त्यात तयार झालेला धुर बाहेर जाण्यासाठी ही मोकळी जागा सोडण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मंदिरामध्ये रेखाटण्यात आलेल्या मुर्ती रेखीव आहेत. या मंदिराचे विहंगम दृश्य डी सुभाष प्रोडक्शनच्या साैजन्याने…

Home » शिलाहार शिल्पकलेचा नमुना असणारे कोपेश्वर मंदिर…(व्हिडिओ)
previous post