गुहागर – येथील पसायदान प्रतिष्ठान, सह्याद्री समाचार न्यूज चॅनेल आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने पसायदान जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे संमेलन रविवारी ( २० ऑगस्ट ) रोजी होत आहे. यामध्ये पसायदान काव्यपुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
रोख रक्कम तीन हजार ,शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यानिमित्ताने पसायदान राज्यस्तरिय निमंत्रितांचे कविसंमेलनही होणार आहे. पसायदान राज्यस्तरिय निमंत्रितांचे कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रभाकर साळेगावकर (बीड) यांची निवड करण्यात आली आहे.
पसायदान राज्यस्तरिय काव्यपुरस्कार २०१२ असे –
घामाची ओल धरून – कवी आबासाहेब पाटील (घुणकी मंगसुळी, बेळगाव )
झाडोरा – डॉ. श्रीकांत पाटील (कोल्हापुर, घुणकी)
सांजात – तहसीलदार व कवी प्रताप वाघमारे (नागपूर)
आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कवींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. संतोष कांबळे, गीतेश शिंदे, सचिन गांगुर्डे, डी के शेख, संजय चौधरी, मांगीलाल राठोड, साईनाथ पाचारणे, अनिल पाटील, प्रमोदकुमार अणेराव ,रमजान मु्ल्ला, हबीब भंडारे, माधुरी मरकड, प्रतिभा सराफ आदींचा यामध्ये समावेश आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.