September 8, 2024
Increase in number of road accident deaths in India
Home » भारतात रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ
काय चाललयं अवतीभवती

भारतात रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ

भारतात रस्ते अपघातांमुळे झालेले मृत्यू

नवी दिल्‍ली – राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे, वर्ष 2018 ते 2022 या कालावधीत देशातील रस्ते अपघातांमुळे झालेल्या मृत्यूची एकूण संख्या अशी: –

वर्षएकूण मृतांची संख्या
20181,57,593
20191,58,984
20201,38,383
20211,53,972
20221,68,491

मंत्रालय हे मृत्यूच्या स्वरूपाबाबत माहिती/डेटा संकलित करत नसले तरी, कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघनांनुसार वर्गीकृत केलेल्या भारतातील रस्ते अपघातांमुळे झालेल्या मृत्यूची संख्या अशी: –

अनुक्रमांकवाहतूक नियमांचे उल्लंघनवर्ष 2022 मध्ये मृतांची संख्या
1वेग मर्यादेचे उल्लंघन1,19,904
2दारू पिऊन वाहन चालवणे/अल्कोहोल आणि अंमली पदार्थांचे सेवन4,201
3चुकीच्या बाजूने वाहन चालवणे9,094
4लाल सिग्नल ओलांडणे1,462
5गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे3,395
6इतर30,435
 एकूण1,68,491

स्टॉकहोम करारातील आपल्या बांधिलकीनुसार, भारत सरकारने 2030 पर्यंत रस्त्यावरील मृत्यू आणि जखमींचे प्रमाण 50% हून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 4ई म्हणजे एज्युकेशन (शिक्षण), इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) (रस्ते आणि वाहने दोन्ही), एन्फोर्समेंट (अंमलबजावणी) आणि इमर्जन्सी केअर (आपत्कालीन सेवा) असा बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यानुसार, मंत्रालयाने विविध उपक्रम सुरु केले आहेत. तसेच, रस्ता आणि वाहन सुरक्षेशी संबंधित अधिसूचना सर्व संबंधित हितधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर वेळोवेळी अधिसूचित केल्या जातात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

विद्रोही जाणिवांतील युद्धरतता

‘बिली अँड मॉली : ॲन ऑटर लव्ह स्टोरी’ ने 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन

Video : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त वाळूशिल्प

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading