कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय अनुवाद साहित्य, भुवनेश्वर, ओरिसा यांच्या वतीने दोन दिवसीय ‘भाषांतरकारांची राष्ट्रीय परिषद’ झाली. यामध्ये अनुवादक डॉ. नितीन जरंडीकर (कोल्हापूर), गणेश विसपूते (पुणे), प्रवासिनी महाकुड (ओरिसा), सोनाली नवांगुळ (कोल्हापूर) यांची मुलाखत मेघा पानसरे यांनी घेतली. भाषांतराकडे कसे वळलात, भाषांतराबाबतचे अनुभव अन् त्यांची आगामी पुस्तके यावर विस्तृत चर्चा या सत्रात झाली.
या परिषदेला ओरिसा, आसाम, छत्तीसगड, बेंगलोर, प. बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सुमारे २०० भाषांतरकार आणि प्राध्यापक उपस्थित होते.