वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा
वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्कृतीमुळे विकसीत होते असे प्रतिपादन भाषांतरकार रघू मिश्रा यांनी केले ते शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या भाषांतरकारांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. पुढे ते म्हणाले, भाषांतरामुळे सांस्कृतिक आदान-प्रदान केले जाते तसेच परस्परसंबंध अधिक सौहार्द केले जातात यासाठी अनुवादकांनी काळजीपूर्वक अनुवाद केला पाहिजे. या समारंभासाठी अध्यक्ष डॉ. अवनीश पाटील यांनी वाङ्मयीन भाषांतराबरोबर ऐतिहासिक आणि पूरातत्व कागदपत्रांचे भाषांतर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. भारतीय अनुवाद साहित्य भूवनेश्वर चे सचिव सरत आचार्य यांनी या परिषदेची फलश्रुती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
दोन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये भारतातील ५०हून अधिक भाषांतरकार सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये भाषांतराची प्रक्रिया, इतिहास, फलश्रृती आणि भाषांतराची प्रक्रियेतील गुंते या मुद्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. आजच्या सत्रात कृष्णा गुडो (आसाम), श्रीरंजन आवटे (पुणे), डॉ. नितीन जरंडीकर (कोल्हापूर), गणेश विसपूते (पुणे), प्रवासिनी महाकुड (ओरिसा), सोनाली नवांगुळ (कोल्हापूर), शरद आचार्य (भूवनेश्वर), सबिता रौत (ओरिसा), बासीरन बीबी(ओरिसा), गोरख थोरात (पुणे), पेरूमल किट्टूस्वामी (तंजावर), मिता दास (प. बंगाल), मंजुळा मोहंती (ओरिसा), कविता गोस्वामी (ओरिसा), रघूनाथ कडाकणे (कोल्हापूर), धनंजय देवळालकर (कोल्हापूर), अजय वर्मा (म्हैसूर), बिजया प्रधान (ओरिसा) इत्यादी भाषांतरकारांनी सहभाग घेतला.
प्रास्ताविक प्रा. मेघा पानसरे यांनी केले तर आभार डॉ. रणधीर शिंदे यांनी मानले. याप्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. राजश्री बारवेकर, विद्यापीठातील विविध अधिविभागातील प्राध्यापक तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, अनुवादक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पाटील यांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.