पणजी : गोमंतकीय मराठी साहित्यिकांना प्रेरणा देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी गोवा मराठी अकादमीने विविध साहित्य पुरस्कारांची योजना जाहीर केली होती. पुरस्कारांसाठी गोमंतकीय साहित्यिकांकडून एकूण ४७ पुस्तके आली होती. यातून परिक्षकांनी साहित्यकृतींची निवड केली असून साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृतींची नावे अशी…
- अरूण नाईक – “वाघकोळंब कथासंग्रह – वि. स. सुखटणकर पुरस्कार,
- भावार्थ मांद्रेकर – ‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ चरित्र – अ. का. प्रियोळकर पुरस्कार,
- गजानन देसाई – ‘दवबिंदू’ ललित लेखसंग्रह – बा. भ. बोरकर पुरस्कार,
- दीपक प्रभुदेसाई – ‘लवलाहो’ कविता संग्रह – शंकर रामाणी पुरस्कार,
- संदीप मणेरीकर – ‘संगीत सूरसाधक’ नाटक – विष्णू वाघ पुरस्कार.
- डॉ. नीता तोरणे – चित्रा क्षिरसागर ‘गोमंतकीय स्त्रीलिखित मराठी कविता’ संपादन, संकलन – डॉ. एस. एस. नाडकर्णी पुरस्कार
- प्राची जोशी – ‘समकालीन कांदबरीकारांचा तौलनिक अभ्यास’ वाङ्मयीन संशोधन – बा. द. सातोस्कर पुरस्कार,
- अजित पैंगीणकर – ‘गावातील माणसांच्या कथा’ – पं. महादेवशास्त्री जोशी पुरस्कार.
कणकवली येथील प्रा. मोहन कुंभार आणि गोमंतकातील ज्येष्ठ मराठी साहित्यिक नारायण महाले यांनी पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. पुरस्कार प्राप्त सर्व गोमंतकीय साहित्यिकांना प्रत्येकी रु.१०,000 आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल. दि. २२ रोजी दुपारी ३ वाजता वास्को येथील रवींद्र भवनात आयोजित केलेल्या वर्धापनदिन समारंभात सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.