September 13, 2024
Maharashtra State Literature award 2021 announced
Home » राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या गटांमध्ये ३३ लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून यात हबीब भंडारे, रमजान मुल्ला, शरद बाविस्कर, दीपा देशमुख , सचिन होळकर यांच्यासह अन्य लेखकांचा समावेश आहे.

उत्कृष्ट वाङ्यम निर्मितीसाठी जाहीर झालेले पुरस्कार साहित्य प्रकार, पुरस्काराचे नाव, पुरस्कार प्राप्त लेखक, कंसात पुस्तकाचे नाव आणि पुरस्काराची रक्कम अशी –

प्रौढ वाङमय (काव्य) -कवी केशवसुत पुरस्कार: हबीब भंडारे (जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता), १ लाख रुपये; 

प्रथम प्रकाशन (काव्य)- बहिणाबाई चौधरी पुरस्कार : रमजान मुल्ला (अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त), ५० हजार रुपये; 

प्रौढ वाङमय (नाटक/ एकांकिका)- राम गणेश गडकरी पुरस्कार : नारायण जाधव येळगावकर (यशोधरा) १ लाख रुपये. 

प्रथम प्रकाशन (नाटक/ एकांकिका)- विजय तेंडूलकर पुरस्कार : शिफारस नाही;  

प्रौढ वाङमय (कांदबरी)- हरी नारायण आपटे पुरस्कार : प्रशांत बागड (नवल) १ लाख रुपये;

प्रथम प्रकाशन (कादंबरी)- श्री. ना. पेंडसे पुरस्कार : श्वेता सीमा विनोद (आपल्याला काय त्याचं..) , ५० हजार रुपये;

प्रौढ वाङमय (लघुकथा)- दिवाकर कृष्ण पुरस्कार : अनिल साबळे (पिवळा पिवळा पाचोळा), १ लाख रुपये; 

प्रथम प्रकाशन (लघुकथा)- ग.ल.ठोकळ पुरस्कार : विश्वास जयदेव ठाकूर (नात्यांचे सर्व्हिंग), 

५० हजार रुपये. 

प्रौढ वाङमय (ललितगद्य) (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार : डॉ. निलिमा गुंडी (आठवा सूर), १ लाख रुपये;

प्रथम प्रकाशन- (ललितगद्य)- ताराबाई शिंदे पुरस्कार : वीणा सामंत (साठा उत्तराची कहाणी), ५० हजार रुपये;

प्रौढ वाङमय (विनोद) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : राजा गायकवाड (गढीवरून), १ लाख रुपये; 

प्रौढ वाङमय (चरित्र)- न.चिं.केळकर पुरस्कार: वंदना बोकील-कुलकर्णी (रोहिणी निरंजनी), १ लाख रुपये;    

प्रौढ वाङमय (आत्मचित्र)- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : शरद बाविस्कर (भुरा), १ लाख रुपये;  

प्रौढ वाङमय (समीक्षा/ वाङमयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन)- श्री. के. क्षीरसागर पुरस्कार: दीपा देशमुख (जग बदलणारे ग्रंथ), १ लाख रुपये;  

प्रथम प्रकाशन (समीक्षा/ सौंदर्यशास्त्र)- रा.भा. पाटणकर पुरस्कार : प्रा.ड़. प्रकाश शेवाळे (अनुष्टभ नियतकालिकाचे वाङमयीन योगदान ), ५० हजार रुपये;  

प्रौढ वाङमय (राज्यशास्त्र / समाजशास्त्र)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : सुरेश भटेवरा (शोध नेहरू-गांधी पर्वाचा ), १ लाख रुपये;

प्रौढ वाङ्मय – (इतिहास) – शाहू महाराज पुरस्कार – शशिकांत गिरिधर पित्रे – (जयतु शिवाजी जयतु शिवाजी), १ लाख रुपये

प्रौढ वाङ्मय – (भाषाशास्त्र/व्याकरण) – नरहर कुरूंदकर पुरस्कार – सदानंद कदम (मराठी भाषेच्या जडणघडणीची कहाणी) – एक लाख रुपये

प्रौढ वाङ्मय – ( विज्ञान तंत्रज्ञान संगणक व इंटरनेटसह) – महात्मा जोतीराव फुले पुरस्कार – अरुण गद्रे (उत्क्रांतीः एक वैज्ञानिक अंधश्रद्धा) – एक लाख रुपये

प्रौढ वाङ्मय -( शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह) – वसंतराव नाईक पुरस्कार – सचिन आत्माराम होळकर ( शेती शोध आणि बोध) – एक लाख रुपये

प्रौढ वाङ्मय – ( उपेक्षितांचे साहित्य – वंचित, शोषित, पिडित आदिवासी, कष्टकरी अनुसूचित जाती व नवबौद्ध इत्यादी) – लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार – सुखदेव थोरात (वंचिताचे वर्तमान) – एक लाख रुपये

प्रौढ वाङ्मय – ( तत्वज्ञान मानसशास्त्र) – ना. गो. नांदापूरकर पुरस्कार – डॉ. आर. के. अडसूळ (सुखाचे मानसशास्त्र) – एक लाख रुपये

प्रौढ वाङ्मय -( शिक्षणशास्त्र )- कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार – डॉ. साहेबराव भुकन ( विनोबा आणि शिक्षण) – एक लाख रुपये

प्रौढ वाङ्मय (पर्यावरण) – डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार – विद्यानंद रानडे ( पाण्या तुझा रंग कसा ?) – एक लाख रुपये

प्रौढ वाङ्मय -( संपादित किंवा अनुवादित) – रा. ना. चव्हाण पुरस्कार – संपादक किशोर मेढे (दलित -भारत दलित भारतमधील अग्रलेख) – एक लाख रुपये

प्रौढ वाङ्मय ( अनुवादित ) – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार – अनुवादक अनघा लेले ( फ्रॅक्चर्ड फ्रीडमः तुरुंगातील आठवणी व चिंतन) – एक लाख रुपये

प्रौढ वाङ्मय (संकीर्ण क्रीडासह) – भाई माधवराव बागल पुरस्कार – आनंद करंदीकर – (वैचारिक घुसळण) – एक लाख रुपये

बाल वाङ्मय – कविता – बालकवी पुरस्कार – विवेक उगलमुगले – ( ओन्ली फॉर चिल्ड्रन) – पन्नास हजार रुपये

बालवाङ्मय नाटक व एकांकिका – भा. रा. भागवत पुरस्कार – डॉ सोमनाथ मुटकुळे (खेळ मांडियेला) – पन्नास हजार रुपये

बालवाङ्मय कादंबरी – साने गुरुजी पुरस्कार – सौ वृषाली पाटील ( पक्षी गेले कुठे ?) – पन्नास हजार रुपये

बालवाङ्मय कथा (छोट्या गोष्टी, परीकथा, लोककथांसह) – राजा मंगळवेढेकर पुरस्कार – सुहासिनी देशपांडे (किमयागार) – पन्नास हजार रुपये

बालवाङ्मय सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे) – यदुनाथ थत्ते पुरस्कार – प्रा. सुधाकर चव्हाण ( चला शिकू या वारली चित्रकला) – पन्नास हजार रुपये

बालवाङ्मय संकीर्ण – ना. धो. ताम्हणकर पुरस्कार – प्रा. विद्या सुर्वे बोरसे ( कोरा कागद निळी शाई ) – पन्नास हजार रुपये

सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार – सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार – परेश वासुदेव प्रभू ( गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य ) – एक लाख रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शमीच्या झाडाचे औषधी उपयोग

अरे बापरे ! हा किडा कोणता ? जाणून घ्या…

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमय पुरस्कारांसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading